रिसोड:- कृषी विज्ञान केंद्र करडाच्या गृहविज्ञान विभागाद्वारे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आत्मा वाशीम अंतर्गत दि.२४ ऑगस्ट २0१५ ते २८ ऑगस्ट २0१५ या पाच दिवसांच्या कालावधीत दालमिल प्रक्रीया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र करडाच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला.
कोणकोण उपस्थित होते
या प्रशिक्षणा करीता मौजे मनभा ता. कारंजा जि. वाशीम येथील २0 महिला प्रशिक्षणार्थीची निवड एमएसीपी प्रकल्पांतर्गत करण्यात आली होती. उद््घाटन प्रसंगी डॉ. आर. एल. काळे कार्यक्रम समन्वयक केव्हीके करडा यांनी शेतमालावर प्रक्रीया करून स्वयंरोजगाराची निर्मिती करावी असे आवाहन केले.
कडधान्यावर प्रक्रीया करण्याचे कौशल्य बद्दल माहिती दिली
एस. एन. वाटाणे कार्यक्रम सहायक गृहविज्ञान यांनी प्रशिक्षणार्थीना कडधान्यावर प्रक्रीया करण्याचे कौशल्य आत्मसात करून त्यापासुन डाळी तयार करून बचत गटाच्या माध्यमातुन मनभा येथे दाल मिलचा व्यवसाय करावा व त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची निवड, लागणारी यंत्रसामुग्री, दालमिलचे अर्थशास्त्र इ बाबींची माहिती दिली.
एस. के. देशमुख विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण यांनी उद्योजकाच्या अंगी असलेले गुणधर्म व कौशल्यावर प्रकाश टाकला तर आर. एस. डवरे विषय विशेषज्ञ पीकसंवर्धन यांनी विविध डाळी प्रक्रीयेपूर्वी विषविरहीत शुध्द व उत्पादन प्रक्रीया तंत्रात पाळावयाच्या बाबी यावर मार्गदर्शन केले.
इतर तपशील
तुषार देशमुख विषय विशेषज्ञ कृषीविद्या यांनी डाळीच्या पीठाची गिरणी उभारणीसाठी आवश्यक बाबी विषयी माहिती दिली. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी डाळ विक्रीसाठी लागणारे परवाने कसे मिळवावे त्यासाठी लागु असणारे नियम कागदपत्रे लेबलींग इत्यादी बाबत सखोल माहिती दिली.
या प्रशिक्षणा दरम्याण कृविके करडाच्या प्रक्षेत्रावर असणार्या डाळप्रक्रीया युनिटमध्ये गंगाबाई देशमुख यांनी डाळ तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले.
या प्रशिक्षणामध्ये अभ्यास दौर्याच्या माध्यमातुन कारंजा लाड येथील टाले यांची नृरसिह डाळ मिल व धान्य स्वच्छ करण्याचे युनिट दाखविण्यात आले. डॉ. निलेश हेडा यांनी प्रोडयसर कंपनी स्थापन करण्यासाठीचे बारकावे समजुन सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. अर्चना कदम, सौ. शिंदुताई शिंदे यांनी अथक परीर्शम घेतले