Headlines

आधार कार्ड address , आणि इतर माहिती घरी बसून मोबाईल वरून कशी बदलायची how to update adhar at home

तसे पाहता भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि गावात राहते आणि ६५% टक्के लोकसंख्येने व्यापलेले हे खेडे गाव. याच्या विकासासाठी सरकार सुद्धा बरेच सरकारी योजना राबवत असते.

जर तुम्हाला मोबाईलवरून आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर ही माहिती संपेपर्यंत पहा.

जर तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्ही बराचश्या सुविधा ऑनलाइन घेई शकत नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
मात्र बहुतांश लोकांना आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे ते सेंटरवर जाऊन तासनतास रांगेत उभे राहतात.
सरकारने वेबसाइट सुरू केली आहे ज्या मधून आपल्याला आपले आधार कार्ड वरची माहिती बदलवता येऊ शकते .

चला तर मग मोबाईलवरून आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून घेऊया.

1. सर्व प्रथम, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, सरकारी वेबसाइट uidai.gov.in उघडावी लागेल, जर तुम्हाला थेट वेबसाइटवर जायचे असेल तर ही लिंक वापरा.

2.यानंतर, सरकारची वेबसाइट उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार भाषा निवडावी लागेल.

3.यानंतर, खाली गेल्यावर, आधार अपडेटच्या विभागात, demographic data आणि check status अपडेट करण्याचा पर्याय असेल जो निवडायचा आहे.

4.यानंतर लॉगिन चेक option दिसेल त्यावर क्लिक करा

5.Login पर्याय निवडल्यानंतर, एक नवीन page उघडेल ज्यामध्ये आधार क्रमांक आणि Captcha कोड भरून OTP पाठवण्याचा पर्याय निवडावा लागेल.

6.यानंतर, आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर 6 अंकी OTP येईल, तो भरा आणि लॉगिन बटण निवडा.

आता आपल्याला जी माहिती बदलायची त्याबद्दल

7.आता इथे नवीन page उघडेल तिथे तुम्ही नाव , जन्म तारीख , पत्ता (Name /Gender /Address ) सारखी माहिती निवडून शकता

8.यानंतर अपडेट आधार ऑनलाइन हा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधारचा पर्याय निवडावा लागेल.

9.यानंतर, आधार कार्डमध्ये तुम्हाला जे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता अपडेट करायचा आहे त्यावर टिक करून तुम्हाला Proceed to Update Aadhar हा पर्याय निवडावा लागेल.

10.यानंतर, तुम्हाला अपडेट करायचा आहे तो सुधारा, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पुढील बटण निवडा. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

Note : तुम्हाला या वेबसाइटवर अशाच नवीन सरकारी योजनांची माहिती देत ​​राहू जेणेकरून तुम्हाला लाभ मिळू शकेल. हा लेख महत्वाचा आहे, कृपया शेअर करा, धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *