आजकाल लोक TWITER वर खूप सक्रिय आहेत. हेच कारण आहे की आजकाल लोक TWITTER चा वापर फक्त SOCIAL NETWORKING साठीच नाही तर तक्रारी नोंदवण्यासाठी देखील करत आहेत, अशाच गोष्टी तुम्हाला सांगतात.
ट्विटर फक्त सरकारलाच तक्रार करण्यास मदत करते असे नाही तुम्ही ग्राहक म्हणून आपली तक्रार मोठ्या मोठ्या कंपनीला त्यांच्या डायरेक्टर ला पण करू शकता
उदाहरणार्थ :
१. २ चाकी ४ चाकी गाड्या
२. रोज वापरात येणाऱ्या वस्तू जसे colgate पेस्ट , mobile इत्यादी
३. Amazon Flipkart Mesho आणि इतर वेबसाइट्स
आणि असे सर्वच वस्तू जे तुम्ही रोजच्या वापरात घेण्यासाठी विक्री करता त्यांची सर्विस बद्दल तक्रार असो किंवा तुम्हाला फसवल्या गेलेलो असो तुम्ही इथे त्याचा पाठपुरावा घेऊ शकता
सर्वप्रथम, तुम्ही twitter.com वर जा आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला लॉगिन लिहिलेल्या त्रिकोणाच्या चिन्हावर क्लिक करा. तुम्हाला मुख्य पानावरच साइन अप पर्याय दिसल्यास, तुमचे पूर्ण नाव, फोन किंवा ईमेल पत्ता आणि पासवर्ड टाकून साइन अप करा. साइन अप करताना तुम्हाला वापरकर्ता नाव विचारले जाते. हवे तसे ठेवता येते आणि गरज पडल्यास बदलताही येते. साइन अप करताना मोबाईल नंबर भरण्याचा पर्याय देखील आहे, जो घेणे चांगले. जेव्हा जेव्हा ट्विटर अकाउंट हॅक होते, तेव्हा दिलेल्या नंबरद्वारे ते परत मिळवणे सोपे होते. साइन अप केल्यानंतर, साइन इन केल्यानंतर सेटिंग्जमध्ये बायोचा पर्याय येतो. यामध्ये तुम्हाला 160 शब्दांमध्ये तुमच्याबद्दल बायो लिहायची आहे. याद्वारे लोक तुमच्याबद्दल जाणून घेऊ शकतात. तुम्हाला ट्विटरचे App Play store डाउनलोड करायचे असल्यास, तुम्ही तुमचे ट्विटर खाते मोबाइलवरून हाताळू शकता तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही TWITTER खात्यावर तुमची तक्रार नोंदवून तुमची तक्रार ज्या विभागासाठी किंवा मंत्री यांना नोंदवायची आहे त्यांना तुम्ही TAG करू शकता. यासाठी तुम्हाला त्यांच्या TWITTER खात्याचा USERID माहित असणे आवश्यक आहे.
इथे काही महाराष्ट्र सरकार चे महत्वाचे ट्विटर आईडी दिल्या आहे तसेच तुम्ही पाहिजे त्या कंपनी , मंत्री , डिपार्टमेंट ची twitter आयडी इथे शोधू शकता.
अस्या पद्धतीने आपण आपली तक्रार इथे ट्विट करू शकता … तर नक्की याचा वापर करा आणि आम्हाला कळवा …
सोबतच ती बातमी आपल्या कडून इतरांना share करा म्हणजे गरजूला याचा फायदा होईन.
2 thoughts on “TWITTER चा वापर फक्त SOCIAL NETWORKING साठीच नाही तर तक्रारी complaint नोंदवण्यासाठी”