आताच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील (राशन कार्ड )शिदा पत्रिका धारक 1 कोटी 63 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे कार्ड असलेल्या नागरिकांना केवळ 100 रुपयात महत्त्वाच्या चार गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
येणाऱ्या गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरिकांसाठी हा शिधा राशन वाटप कार्यक्रम राज्यशाशन राबवणार आहे.
केशऱी कार्ड धारक अर्थात राशन कार्ड धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिनाभर ही योजना सुरु राहील.