Headlines

अस्तित्वाचा संघर्ष : कामगार,हॉटेल मध्ये (१० वर्ष) सुपरवाईसर , मॅनेजर ,ITI स्टेनोग्राफर,परीचर,पोलीस ते उच्चश्रेणी लघुलेखक : जयेंद्र गुणसागर मनवर A Struggle for existence : Jayendra Gunsagar Manwar

Interview

गरिबीचं भांडवल करण्यापेक्षा त्या काळोख्या डोंगरांतून क्षितिज पाहणे व सतत विद्या अर्जित करून एक एक पाऊल टाकत क्षितिज गाठणे हे या आजच्या मुलाखतीतून समजणार आहे.

हा लेख आजच्या विध्यार्थी , तसेच गरीब विध्यार्थी ज्याचे कडे अठराविश्वे दारिद्र्य पोसले आहे त्यांच्या साठी प्रकाश आणि मार्ग दाखवणार ठरणार आहे. विध्यार्ध्याने आवर्जून वाचावं…

उंचावलेल्या अगदी स्पर्शही न करता येणाऱ्या आभाळाला स्पर्श करणे, पंखामध्ये अनंत बळ असणाऱ्या या पाखरांनाही शक्य होत नसतं. पण तरीही उंच आणि केवळ उंचच उंच जाण्याची त्यांची जिध्द मात्र कधी कधी व्याप्त अशा असमंतालाही लाजवणारी असते. चौफेर आकाशाच्या आणि अनंत संचार करणाऱ्या त्या निरागस पाखरांना ज्या प्रमाणे निवासासाठी पृथ्वीची आणि ध्येय गाठण्यासाठी मुक्त आभाळाची गरज भासते, त्याच प्रमाणे स्पर्धकानाही आत्मविश्वासाच्या पंखाना उभारी देवून उंच ध्येय गाठण्यास प्रयत्न करतांना पाउलांची झालेली उचल मात्र जमिनीवरच ठेवावी, असे मत जलसंपदा विभाग, अमरावती येथे उच्चश्रेणी लघुलेखक (Higher grade Stenographer) पदावर कार्यरत असणारे श्री जयेंद्र गुणसागर मनवर यांनी विचार वृत्त ला दिलेल्या दिलखुलास चर्चे दरम्यान बोलतांना व्यक्त केले.

राहते गाव

मु. पो. कार्ली ता. मानोरा जि. वाशिम येथील रहीवास असलेले श्री जयेंद्र गुणसागर मनवर है. जलसंपदा विभागामध्ये उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) या पदावर कार्यरत आहेत, याच दरम्यान विचार वृत्तचे संपादक विद्यानंद राऊत यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता भरकटलेल्या आयुष्याला मिळालेली नवी दिशा आणि त्या ध्येय निर्मीतीमुळे निमार्ण झालेल्या आजच्या सुखद आठवणींना विचार वृत्त साप्ताहिकशी बोलताना त्यांनी उजाळा दिला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कौटुंबिक परीस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे मनात कुठेतरी एका बंदिस्त कोपऱ्यात दळलेल्या इच्छा, अपेक्षा उमलून येत नव्हत्या. हातावर मिळवीलेल्या अन्नावर जीवन जगतांना आजच कमवाव आणि आजच खाव अशी परीस्थिती होती. त्यातच वडीलांकडे शेती नसल्यामुळे दुसऱ्याकडे कामाला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जीवनात पादेपदी निर्माण होणाऱ्या संघर्षाला अगदी निर्भीड लढवय्या सारखे समोर जावून सर्वच कुटुंबाचा आधारस्तंभ होवू शकले ते आई-वडीलच. आई-वडीलच्याच कर्मानी आणि आर्शिवादाने आज या पदावर असल्याचेही यावेळी त्यांनी विचार वृत्तशी बोलतांना सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आयुष्याच्या या सर्व घटनाक्रमामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा संघर्ष संपला आणि पूढील शिक्षण घेण्यासाठी आतुरलेल्या मनाला आचानक कुठेतरी ब्रेक लागाला २००२ पर्यंत कुटुंबीयासोबतच आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुखात सहभागी होतो पण परीस्थिती पाहता आपणही या कुठेतरी सहभागी व्हावे या उद्देशाने थेट अमरावती गाठले. अमरावतीला आल्यानंतर हॉटेल रामगिरी येथे वेटर म्हणुन काम सुरु केले नंतर

१० वर्ष सतत केली मेहनत

Kitchen Supervisor, Captan, Manager अशा विविध पदावर एकुण दहा वर्ष जीवनातील एक दशक काळ Hotel Industries मध्ये घालविला. कधी कधी असे जाणवत होते की, आयुष्याच्यात केवळ-या शिवाय दुसर काहीच उरले नाही. सतत काम आणिक केवळ काम करीत असल्यामुळे बाहेरील जगाशी असलेले नाते जवळपास संपल्यासारखेच होते. या पुढे दुसरे काहीच नसावे याच अपेक्षेने जीवनातील १० वर्षांचा महत्वपुर्ण कालावधी Hotel Industries मध्ये काढला. पण निर्सगाला काहीतरी वेगळेच मान्य होते. त्या बंदिस्त अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाची वाट निर्माण करणारे अँड. धीरज वानखडे यांनीच दाखवीली. कामात आमच्यापेक्षा वरिष्ठ असूनी सर्वांना सांभाळून घेण्याबरोबरच योग्य मार्गदर्शन देवून आयुष्यातील कुठलीही गोष्ट साध्य करता येते. अशी प्रेरक आणि परीणात्मकारक जिध्द त्यांनी नेहमीच पेटवीत ठेवली. अशातच सन २००६-०७ मध्ये आयटीआय, अमरावती या सरकारी संस्थेमध्ये English Stenographer या एक वर्षाच्या कोर्सकरीता माझा नंबर लागला व चांगल्या क्रमांकाने पासही झालो. हॉटेलमध्ये सकाळी ७ ते ११ व संध्याकाळी ७ ते ११ अशी कामाची वेळ होती आणि कॉलेजची वेळ ही सकाळी १० ते ५ अशी होती. काम करून कॉलेज करणे यामुळे अभ्यासासाठी केवळ रात्रीचीच वेळ मिळायचा. नेमका याच वेळात अभ्यास सुरु केला. संपुर्ण दिवस कामात व कॉलेलमध्ये जात असल्यामुळे खाजगी शिकवणी (Classes) लावणे शक्यच नव्हते. सन २००८ ते ०९ या कालावधी मध्ये Marathi Stenographer पण यशस्वीरित्या पुर्ण केले.

अर्थ समजुन घेण्याची जिद्द

सुरुवातीपासुनच विषयाचा संपुर्ण अर्थ समजुन घेण्याची जिध्द असल्यामुळे पुस्तक वाचतांनाही जो पर्यंत पुर्णतः समजत नाही तो पर्यंत त्या विषयाचे वाचन करुनच पुढे त्या विषयावर मत व्यक्त करणे योग्य असते. मुळात स्पर्धा परीक्षा म्हटले की विषयाचे सखोल वाचनच असावे असे समिकरण आपोआपच जुळत जाते. परीक्षा पध्दती वस्तुनिष्ट असली तरी केवळ वैकल्पिक वाचनच केले नाही. क्लासेस लावले नसल्यामुळे उपयुक्त पुस्तके घेवूनच सेल्फ स्टडीला सुरुवात केली. कामाचा आणि अभ्यासाचा वेळ अगदी ततोतंत असल्यामुळे ३ ते ४ तासापेक्षा जास्त वाचन होत नसे. पण तेच वाचन जर परीणात्मकारक आणि योग्य पध्दतीने केले तर त्याचा फायदा हा होतोच याचे भान मात्र नक्कीच होते.

सेल्फ स्टडी आणि ग्रुप स्टडी

सेल्फ स्टडी बरोबरच थोडयाफार प्रमाणात ग्रुप स्टडी पध्दतीचा अवलंब केला. या सर्व अभ्यासात्मक परीक्षा पध्दतीचा अवलंब करता करता सन २०१० साल उजाळले. आपण करत असलेल्या अभ्यासाची पारक व्हावी यासाठी परीक्षा देण्याचे नक्की केले. आणी सन २०११ साली जिल्हा परीषद, अमरावती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीचर या पदासाठीची परीक्षा दिली आणि त्यात निवडही करण्यात आली.

६ महिण्याचा कालावधी उलटल्यानंतर अमरावती शहर पोलिस विभागात कॉन्स्टेबल या पदाकरीता परीक्षा देवून त्यातही चांगल्या गुणांनी उर्तीण होवून निवडही करण्यात आली मात्र कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असतांना एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे शासनाने काढलेल्या आरक्षणाच्या जी.आर. प्रणालीमुळे कॉन्स्टेबल पदाची नोकरी सोडावी लागली. पण कॉन्स्टेबल पदावर असतांनाच इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व परीक्षा देणे सुरुच होते. कारण मी मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफरचा कोर्स पुर्ण केला असल्यामुळे मला स्टेनोग्राफरची नोकरी करणे माझे लक्ष होते. सुरुवातील मी परीचर व कॉन्स्टेबल ही नोकरी केली. (something is better than nothing) पोलीस खात्यामेध्य असतांनाच सन २०१२ मध्ये जलसंपदा विभागामध्ये उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) या पदासाठी निघालेल्या जाहिरातीमध्ये आत्मसात केलेले ज्ञान प्रत्यक्षात पडताळून पाहण्यासाठी परीक्षा दिली व याच पदासाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये माझी निवडही करण्यात आली व कार्यरत सुध्दा झालो. अवघ्या १८ महिण्यामध्ये मी ३ सरकारी नोकऱ्या मिळविल्या तेही Without Tuition Classes. जीवनात पदोपदी कधी संघर्षाच्या रुपाने तर कधी आनंदाच्या रुपाने येणाऱ्या त्या सर्व क्षणांना एकत्रित करुन आयुष्यात आज प्राप्त केलेले यश आणि मिळत असलेल्या आनंदात सर्व सार्थक झाल्याचेही यावेळी त्यांनी विचार वृत्तशी बोलतांना सांगितले.

वाचण्याचे सातत्य

सेल्फ स्टडी हा एक उपयुक्त पर्याय असुन या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांनी वाचनात ठेवलेल्या सातत्यावरच मिळणाऱ्या यशाचा कालावधी निश्चित असतो. दिवसातुन ६ ते ८ तासच वाचन करावे त्याच बरोबर ग्रुपस्टडी हा सुध्दा एक उपयुक्त आणि परीणामकारक पर्याय आहे. ग्रुपस्टडी करण्याआधी विषयाचे नियमीत वाचन करणे महत्वाचे आहे. ग्रुपस्टडीमध्ये ३ ते ४ विद्यार्थ्यांचाच ग्रुप असावा अन्यथा विषयाची चर्चा भरकटण्यास जराही वेळ लागत नाही. ग्रुपस्टडीमध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी व्यकरणाच्या भाषेवर जास्त भर द्यावा. तसेच प्रत्येक दिवसाच्या वर्तमानपत्राचे वाचन करुन एक नोट तयार करावी.

संपादकीय लेख वाचन

तसेच खासकरुन संपादकीय लेखामधील माहिती आपल्याकडे जपून ठेवावी कारण संपादकीय लेखामधील माहिती ही खुप सखोल आणि इतिहासाला अनुसरुन असते ती माहिती आपल्या इतरानकडुन कदाचित मिळणे शक्यच नसते म्हणुन ती जपून ठेवावी व वारंवार वाचत राहावी.

क्लासेस हा व्यावसाईक विषय

स्पर्धा परीक्षेमध्ये खाजगी क्लासेस शिकवणीचे वाढते वलय लक्षात घेता क्लासेस हा व्यावसाईक विषय झालेला दिसुन येतो. विद्यार्थ्यांनी केवळ एक मार्गदर्शक म्हणुन क्लासेसचा वापर करावा पण, क्लासेस लावलेच पाहिजे असे गरजेचे नाही. क्लासेस न लावताही विद्यार्थी यशस्वी होवून शकतो. प्राथमिक स्तरावर मार्गदर्शकांच्या रुपाने घेतलेले मार्गदर्शन हेच योग्य ठरेल. पण केवळ व्यवसाईकरणाच्या मुलभूत संकल्पनेने प्रेरीत असलेल्या क्लासेस पासून विद्यार्थ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

तुलनात्मक वाचन

सध्याची परीक्षेची पध्दती वस्तुनिष्ठ जरी असली तरी स्पर्धा आणि स्पर्धात्मक अभ्यासाचा मुळ गाभा हा वर्णनात्मक वाचनातच दळला असतो, तथा या पध्दतीमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकच सखोल आणि तुलनात्मक वाचन करणे गरजेचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाराखी ती म्हणजे वर्णनात्मक वाचनाबरोबरच कमी जास्त प्रमाणात वैकल्पीक वाचन करत राहणे सुध्दा तितकेच महत्वाचे व योग्य आहे. जर विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी वैकल्पीक वाचनावर अवलंबुन राहत असेल तर विद्यार्थ्यासाठी अयोग्यच आहे, असा मागर्दर्शन सल्लाही यावेळी त्यांनी विचार वृत्तशी बोलतांना दिला.

सरते शेवटी संदेश

अदृष्य वाटेवर चालतांना तळपायाला रुतलेला काटा व अंगठयाला लागलेली दगळांची ठेच आयुष्यातील संघर्ष अजुनही शिल्लकच आहे यांची जाणीव करुन देणारी ठरते. याच संघर्षाच्या काळोखाला कणखर आत्मविश्वासाने आणि प्रबळ इच्छाशक्तीने प्रकाशमयी करणाऱ्या त्या लढवय्या व्यक्तीमत्वाच्या आठवणींना डोळयातील पापण्यांमध्ये बंदिस्त करून नेहमीप्रमाणे मी त्यांचा निरोप घेतला.

निराशेचा काळोख मिटविण्यासाठी आशेचा अंकुर फुलवावाच लागतो... : जयेंद्र गुणसागर मनवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *