!! कार्तिक मास !!
बाभूळीच्या काळ्यामठ्ठ ,
झाल्या फांद्या तर्णी बांडं .!
गोरी गोमटी डहाळी ,
पीली हळदीचं खांडं ..!! २ !!
डोळे आली सिताफळी ,
पाहे लोंबकुनं भुई .!
गोड रानातला मेवा ,
दूध साखरेचा बाई ..!! ३ !!
उभ्या बांधावरं बोरी ,
आता आल्या वयामंधी .!
तिच्या जिवालाचं धाकं ,
मिळे दगडाला संधी ..!! ४ !!
भरे दाण्यातं दुधाळी ,
धांडा वाऱ्यावरं डुले .!
बसे येऊनं साळुंखी ,
दाणे नोचताना झूले ..!! ५ !!
मोहं बेहड्याची सालं ,
सोडी गंधाच्या खिपल्या .!
हेंकळीच्या काट्यावरं ,
येली तनांन झोपल्या ..!! ६ !!
कवी : माणिक उ. सोनवणे
रा. ता.सोयगांव.
जि : औरंगाबाद.
फोन नं : ९०२२२४०३११