आज राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केल्यास तिकिट दरात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
या महिला प्रवाशांच्या तिकिटाच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार भरणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून ३० विविध सामाजिक गटांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे. महिलांन मध्ये या अर्थ संकल्प मधून समाधान भेटल्याचा दिसत आहे कारण सरसकट सर्व महिलांना या बस ५०% सवलतीचा फायदा घेता येणार आहे.