Headlines

जाणून घ्या नवी आणि जुनी पेन्शन योजना. what are the new and old pension scheme

OPS (Old Pension Scheme) जुनी पेन्शन योजना and NPS (New Pension Scheme)नवी पेन्शन योजना

नवीन पेन्शन योजना कोणी सुरु केली ?

सध्या कर्मचाऱ्याच्या संपाने पुन्हा एकदा सरकारी संस्था मधील कामकाज ठप्प झाले आहे. बऱ्याच वर्षा पासून कर्मचारी हे आम्हला जुनी पेन्शन योजना लागू करा कारण नवीन पेन्शन योजने मध्ये ते नाखुश आहेत.

तसे २००४ पूर्वी जुन्या पेन्शन योजना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागु होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर निश्चित असे पेन्शन सरकार कडून दिल्या जात होते. हे कर्मचाऱ्याच्या निवृत्ती आधी पगारावर आधारित होते.

तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या कुटुंबियाला पेन्शन देण्याची तरतूद होती.

अटलबिहारी वाजपेयी याच्या नेतृत्वातील सरकारने एप्रिल २००५ नंतर नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली. त्याच्या जागी हि नवीन पेन्शन योजना लागू केली आणि हेच पॅटर्न आता राज्य सरकारने राबविले.

अशी आहे जुनी पेन्शन योजना (OPS)
१. या योजनेत कर्मचार्‍याच्या पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जाते म्हणजे ५०% निधी


२. या योजनेत २० लाख रुपयांपर्यंतचीभविष्य निधी उपलब्ध आहे.

३. जुन्या पेन्शन योजनेत पेमेंट सरकार पेन्शन देते .

४. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनची रक्कम मिळते.


५. जुन्या पेन्शन हे कर्मचाऱ्याचे पगार मधून पैसे घेत नव्हते .

६.तसेच पेन्शन मध्ये महागाई भत्ता मिळत होता

७. हि योजना फक्त सरकारी नोकरलाच होती.

नवीन पेन्शन योजनेत काय विशेष आहे?
१. नवीन पेन्शन स्कीम (NPS) मध्ये कर्मचाऱ्याच्यास्वतः त्यांच्या पगारातून १०% + डीए जमा करतो .


२. ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे ते असुरक्षित आहे.

३. या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी पेन्शन योजना (NPS )निधीच्या ५० टक्के रक्कम पगारातुन गुंतवावी लागते.

४. निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नाही कारण मार्केट वर अवलंबून असेल .

५. या पेन्शन ला सुद्धा टॅक्स (कर ) द्यावा लागेल

६. महागाई भत्ता मिळण्याची कोणतीही तरतूद नाही.

७. नि योजना प्रायव्हेट नोकरांना वापर घेता येईन.


अधिक बातम्या साठी :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *