२० मार्च हा दिवस जगभरात साजरा होत आहे. कारण हि तसेच आहे जी आपली पिढी चिमणी कवड्याची गोष्टी सांगून त्यांना पाहून त्याच्या सोबत राहुल सुरु होत होते. सकाळी त्यांनी पाहून कुठे उडते कुठे बसते हे सर्व न्याहाळत कित्तेकदा माझ्या सारख्या चा दिवस निघून जायचा. आता हे सर्व येणाऱ्या पिढीला शहरात राहून तरी करता येणार नाही.
काही खेड्या गावात सुद्धा चिमण्या हा प्रकार आता कमी झालेला दिसतो. म्हणून इथे ह्या काही ओळी आठवत आहे. कदाचित तुम्हाला पण आठवत असेल.
एकदा काय होतं? एका वर्षी खूप मोठ्ठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. चिऊचं घर तसंच राहतं. मग काऊ काय करतो? तो येतो आपल्या चिऊताईकडे. दारावर टकटक करतो आणि म्हणतो:
काऊ – चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ – थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे
काऊ – चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ – थांब माझ्या बाळाचं आंग पुसू दे
काऊ – चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ – थांब माझ्या बाळाची टिटी पावडर करू दे
काऊ – चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ – थांब माझ्या बाळाला अंगा घालू दे
काऊ – चिऊताई चिऊताई दार उघड
चिऊ – थांब माझ्या बाळाला गाई करू दे
अश्या प्रकारे आजीबाई आपल्याला या गोष्टीत गुंतुन ठेवायची पण आजची आजीचं आता फेसबुक आणि इंस्टाग्राम व्हाट्सअँप वर बिझी झाली.
आणि आता हल्ली मुले पण youtube चे शॉर्ट्स पाहताय त्यामुळे त्यांना आता चिमणी मोबाईल मध्ये च दाखवता येईन कि काय असे झाले.
चिऊ चिऊ चिमणी
अगं ये चिमणे , काय रे चिमण्या..
हे बघ आणलाय मोत्याचा दाणा..
बघू बघू पण ठेवायचा कुठे?
असे गाणे सुद्धा शाळेमध्ये शिवकायचे आणि मुलं सुद्धा अस्या गाण्याला शिकून ते मोठ्या आनंदाने गात राहायचे पण आता गाणे पण शिकवणे कमी झाली.
आताच्या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिमणी हा पक्षी आहे हा खूपच कमी झाला आहे . याचे बरेच काही कारण आहेत म्हणून चिमणी वाचवा हा दिवस 20 मार्च ला जगभरामध्ये साजरा करण्यात येतो.
चिमण्याची ही झालेली कमी संख्या ही कशी वाढेल व याची कोणत्या कारणाने हि संख्या कमी झाली व त्या साठी काय करावे लागेल याला जबाबदार कोण आहे हे सर्व सविस्तर पाहूया.
चिमण्या कमी का होत आहे
आज ची खेडेगावात अगोदर खूप झाडी असायची. पण आता आंब्याची झाडावर केलीली घरटे त्यातून बाहेर येऊन चिमण्या चिव चिव करायच्या. हे दृश्य आता शहरातच काय खेड्यामध्येही पाहायला कमी मिळत आहे.
तसे आता चिवताई नि शहर सोडले आहे कारण त्या काँक्रीट जंगल मध्ये तिला राहणे कठीण झाले होते त्याचे पुढील करणे असू शकतात.
- १. त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणे
- २. अन्न/पाण्याची कमतरता
- ३. प्रदूषण (सर्व प्रकारात)
- ४. मोबाईल चा अति वापर त्यामुळे रेडिएशन
- ५. इंटरनेट आणि टीव्ही सिग्नलमधून होणारे रेडिएशन ही काही सामान्य कारणे आहेत ज्यामुळे हे लहान पक्षी गायब झाले आहेत.
आपण काय करू शकतो
गावामध्ये अजून एवढे प्रदूषण झालेले नाहीत त्यामुळे अजून काही भागात तूरडक प्रमाणात तुम्हाला चिमण्या व छोटे पक्षी दिसतील त्यांना त्यांच्या साजेस असं वातावरण तयार करणे.
तसेच प्रदूषण जेवढे कमी होईन तेवढे कामे करणे.
आणि जे निसर्ग ने दिलेली अफाट संपत्ती आपण जोपासणे म्हणजे चिमणी व इतर छोट्या पक्षांना आपण सहारा देऊ.
जंगले वाचवणे म्हणजेच आपल्या हातून मोठे काम केल्या जाऊ शकतील.
जसे कि संत तुकाराम महाराज म्हणायचं तसाच आपण वागायला पाहिजे.
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकान्ताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद ।
आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥
चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे यायला हवे. यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरात भरपूर झाडे लावा आणि आपला परिसर हरित करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपले आहे आपले नातलग आहेत सखे सोयरे आहेत हा भाव स्वतःत आणि इतरांत रुजवणे महत्वाचे आहे.
तसेच उन्हाचा ऊन वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी.
त्यासाठी एखादे मातीचे भांडे म्हणजे पाणी थंड राहील अडकवून ठेवावे.
उरलेले अन्न किंवा इतर धान्याची त्यांच्यासाठी व्यवस्था करणे
चला पुन्हा एकदा
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥