Headlines

amazon layoff : amazon मध्ये आनखी 9000 कर्मचारी होतील कमी Latest news what is layoff?

amazon layoff

अजून आता दुसऱ्या फेरीत, Amazon ने पुढील काही आठवड्यात आणखी 9,000 नोकर्‍या कमी करण्याची घोषणा केली आहे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोमध्ये असे सांगितले.

बँकिंग क्षेत्रातील सध्या सुरू असलेले संकट जसे कि आत्ताच सिलिकॉन वेली बँक दिवाळखोर निघाली आणि अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या क्लाउड कंपन्यांचे घटते आर्थिक बाजू जागतिक मंदीकडे निर्देश करतात.

आता प्रश्न पडतो की त्याचा परिणाम भारतातील आयटी क्षेत्रावर कसा होणार आहे. भारतीय आयटी क्षेत्राला नजीकच्या भविष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, असे स्पष्टपणे म्हणता येईल.

जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांपैकी एक असलेल्या Amazon ने जाहीर केले आहे की ते दुसऱ्या फेरीत 9,000 कर्मचार्‍यांना काढून टाकतील.

याआधी ऍमेझॉन ने जानेवारीमध्ये, घोषणा केली की ते 18,000 कामगारांना काढून टाकेल तास पाहता हे आता पर्यंत ची IT मधले सर्वात मोठे कर्मचार्याची छाटणी(lay off) आहे. हे फक्त ऍमेझॉन मधेच नाही तर जगातल्या मोठ्या IT कंपनी मध्ये जसे कीं Google , Microsoft , salesforce, IBM व इतर कंपन्यांचा या मध्ये समावेश आहे.



what is lay off ? ले ऑफ काय( टाळेबंदी )आहे?

टाळेबंदी म्हणजे कर्मचार्‍याच्या कार्यक्षमतेशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे नियोक्त्याने तात्पुरती किंवा कायमची नोकरी रद्द म्हणजे नोकरीवरून काढणे होय.

जेव्हा कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या मागणीत घट झाल्यामुळे, हंगामी बंद झाल्यामुळे किंवा आर्थिक मंदीच्या काळात खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवतात तेव्हा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते.

कामावरून काढून टाकल्यावर, कर्मचारी सर्व वेतन आणि कंपनीचे फायदे गमावतात परंतु बेरोजगारी विमा किंवा भरपाईसाठी पात्र असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *