Headlines

विध्यार्थ्यांसाठी महत्वाचे : स्वाधार योजना बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्या साठी ५१००० रुपये अर्ज पहा डाउनलोड करा . how to apply for swadhar yojna samaj kalyan

swadhar yojna

स्वाधार योजना काय आहे ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने 2016 ते 2017 मध्ये सुरु केली. हि योजना एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.

स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च , जेवणाचा आणि इतर शिक्षणासाठी लागणार खर्च निधी म्हणून दरवर्षी 51,000/- रुपये हि साहाय्य निधी दिल्या जाते.



पात्रता काय पाहिजे

योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी किंवा 12वी, पदवी / पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के अशी पात्रता आहे .

इतर माहिती साठी sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळ ला भेट द्यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *