या मधे जडनघडनिचे महत्व काय हे आता आपण पाहुया : Process of child memory development
काय असते जडणघडण?
मुलाच्या वाढीकडे विशेष लक्ष देणे खूप गरचेचे असते. जसे कि त्याला काय शिकवायला पाहिजे तसेच त्याला काय व कस बोलायला शिकवायचे,खाण्यास कसे शिकवायचे, मोबाइल वापरावर लक्ष ठेवणे इत्यादी.
त्याचबरोबर लहान मुला मुलींना शिकण्या पेक्षा ते आपले अनुसरण करतात मोठ्यांच्या वागणुकीचे.
५०% परिपक्वता येते (memory occupied till that time)
वयाच्या ८ व्या वर्षा पर्यंत मुले जे शिकतात किंवा जे काही तो ग्रहण करतो त्या शिक्षनांवर त्याच्या ५० टक्के बुद्धिचा साठा तयार होतो.
व त्यामध्ये कार्यक्षमता येते की विशिष्ठ परिस्थिति मधे मागील अनुभावारून मी काय करायला पाहिजे. असे करून तो भावी आयुष्य घडवत असतो.
व्यक्तीचे भावी आयुष्य तो जे काही ८ ते १० वर्षा पर्यंत जगला त्याच अनुभवाच्या पायावरून बांधायाला सुरुवात होते. ते नंतर अचेतन मनाद्वारे आपल्या दैनंदिनी मधे कार्यरत होत असते. ते आपल्या समोरील वयामधे तत्काल लक्षात येणार नाही परतु ते प्रतेक कृति मागे कार्यरत असते.
उदाहरणार्थ : एक गोस्ट पाहूया
प्लेट मध्ये कही तरल आलेली भाजी ३ वर्षा च्या मुलाला जर दाखवली तर तो लगेच अंदाज लावेल की ह्या प्लेट मध्ये भाजी आहे.
तीच प्लेट एका ८ ते १० वर्षाच्या मुलाला दिली. तो म्हणेन ‘ही वांग्याची भाजी आहे आणि ही भाजी मला आवडत नाही’ किंवा ‘ही कोबीची भाजी आहे, ही मला खूप आवडते.
मेंदू हा फार तीव्र असतो
लहान वयामधे तुम्ही मुलाना काहीही शिकवू शकता आणि त्यांचा मेंदू हा फार तीव्रतेने ते ग्रहण देखिल करत असतो. पण यावर तेव्हा मात्र तो विचार करत नाही.
माझे स्वताचे उदाहरण इथे घेता येइल की, मला शाळेच पाठवायला घरच्यांना फार त्रास होत होता. कारण तेव्हा मी विचार करत होतो की कशाला शाळेत जायचे, गावात नदीवर, फिरन्याची मजा सोडून कुठे सरांचा मार खायचा.
पण हा विचार मला जास्त दिवस करता आला नाही कारण वडिलांनी मला शाळेत जा हे सांगण्याची पध्दत बदलली होती.
साहजिकच मला माझा विचार बद्लायला भाग पाडले. नंतरच्या काळामधे घरच्यांना जरी बाहेर जायचे असेल तरी पण मी सहजा सहजी शालेतुन सुट्टी काढायला तयार होत नव्हतो .
त्यावेळेला मला फ़क्त घरचे शिकवतात म्हनून शिकायचे असा माझा उपक्रम चालू होता. तेव्हा मी हा तर्क करू शकत नव्हतो की शिक्षण मला काय देणार आहे किंवा याचे महत्व काय. ते नंतरच्या काळात मला समजले.
मुलांचे / मुलींचे सुप्त मन
मुलांचे / मुलींचे सुप्त मन कृती कडे जास्त लक्ष देते. Subconscious mind pays more attentions to actions
मुलांचे / मुलींचे सुप्त मन
जडनघडण ही विधायक आचरणाची असली पाहिजे कारण या वयामध्ये तर्क बुद्धि फार हळुवार पने कार्य करत असते आणि ती परिपक्व नसते.
जडनघडण मधे आपल्याला भेटलेली माहिती ही स्थायीरुपी आपल्या मेंदू मधे साठवलेल्या जाते.
नंतर च्या काळामधे तीच जडनघडण आपला स्वभाव बनवत असतो. विचार-आचार-कृति ही स्वभावातुन घडत असते व तो स्वभाव आपल्याला असा चिपकतो की नंतर इच्छा असतांनी सुद्धा आपण त्याला बाजूला करू शकत नाही.
आई वडील जास्त महत्वाचे घटक
लहान मुले आपण म्हणजे त्यांचे आई वडील आणि इतर पण , पण आई वडील थोडे जास्तच प्रमाणात या प्रक्रियेत सामील असतात. म्हणजे शिकवायचे त्या पेक्षा मुलं आपले सभोवती कोण काय करतात याकडे जास्त लक्ष देतात. ते जर मोबाइल चा वापर जास्त करत असेल तर ते पण मुले तसेच करतील मग तुम्ही त्यांना मारा, ओरडा त्याच्यावर तो परिणाम होणार नाही. ते मोबाइल घेऊन बसतीलच त्यामुळे अगोदर आपण मोबाइल वापर कमी करावा म्हणजे आपली कृती ते अनुसरण करतील.
स्वभाव का बदलता येत नाही ? why then nature can not be change
जडनघडण हा एक स्वभाव बनवन्याचेच काम करत असते. भावी आयुष्यामधे तो आपला स्वभाव बनतो. आणि स्वभाव मात्र नंतर बदलवता येत नाही असे बरेच जन म्हणतात .
मला असे इथे असे सांगुन आपल्या परिवर्तन वादी विचारांना निरुस्साही करण्याचा विचार नाही. स्वभाव बदलने शक्य आहे परतु ते सोपे नाही, त्याठी आपण ध्यान, समोहन यासारखे पर्याय अवलम्ब करू शकता पण यामध्ये परिश्रम आले.
संदेश
एकतर अगोदर जडनघडण चांगली करा किंवा फार परिश्रम करून पूर्ववत व्हा. पूर्ववत होने अवघड जरी असले तरी अशक्य नाही. कुठलाही पर्याय अवलंब करून स्वतःला घडवा.
लेख आवडला असेल तर नक्की इतरांना सांगा.
अधिक वाचण्यासाठी
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
- काय आहे थायरॉईड ? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh Thyroid test normal range in marathi )
- डोळ्यांची ताप साथ सर्वीकडे पसरतेय – मुंबई पुणे नागपूर , काय करणार उपाय जाणून घ्या : Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu, know more in marathi
- महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)