हे सोयगाव शहराचे ग्रामदैवत आहे तसेच याला नवसाला पावणारा हा देव आहे तोच म्हणजे भैरवनाथ महाराज. या मंदिरात यात्रा उत्सव सुरू आहे दिनांक ०६ एप्रिल २०२३ आज गुरुवारी ही यात्रा सुरू झाली . हि माहिती दिलीप बिर्ला यांनी दिली.
भैरवनाथ महाराजांचे दर्शन घ्याला येतात बरेच काही लोक , जवळपासचे किंवा बाहेरगावी या भैरवनाथ मंदिरामध्ये येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून नवस कबूल करतात. आणि नवस फेडण्यासाठी आज तो दिवस आहे . नवस फेडण्यासाठी असतो व त्याचबरोबर बारा गाड्या पण ओढल्या जातात हे दृश्य पहायला या ठिकाणी सर्वजण उत्सुक असतात .
या मंदिराचे वैशिष्ट्ये
- भैरवनाथ मंदिरातील महाराजांची मूर्ती ही पूर्णपणे लोण्यापासून तयार करण्यात आलेली आहे
- हि मूर्ती चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची आहे येथील मूर्तीच्या लोण्यावर लोणी टाकून ही मूर्ति उभी राहिलेली आहे
- इथे यात्रेच्या दिवशी बारा गाड्या पण ओढण्याची पद्धत आहे हे दृश्य पहायला या ठिकाणी सर्वजण उत्सुक असतात
- नवसाला पावणारा जागृत भैरवाथ महाराज असे प्रचलित आहे
- एप्रिल महिन्याच्या भरणाऱ्या यात्रेसाठी राजस्थान गुजरात मध्य प्रदेश माहेरी कानाकोपऱ्यातून भाविक नवस करण्यासाठी येत असतात
- वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याला साप चावला असेल तर त्याला लवकरात लवकर तिथे नेल्यानंतर सापाचे विष हे अर्ध्या रस्त्यामध्येच उतरून जाते.
भेरवनाथ जाण्याचा मार्ग:
हे सुप्रसिद्ध बौद्ध लेण्या अजंता च्या जवळ आहे. तालुका सोयगाव , जिल्हा छत्रपती संभाजी नगर इथे जाण्यासाठी तुम्हाला थेट छत्रपती संभाजी नगर वरून सोयगाव बस मिळेल सुमारे ११७ किलोमीटर आहे.
तसेच आपण जळगाव वरून सोयगाव जाण्यासाठी पण महाराष्ट्र बस सेवा सुरु आहे. हे ५९ किलोमीटर आहे.
इतर माहिती
येथील देवस्थाना मध्ये महिलांना प्रवेश नाही असे म्हणतात कि महिलांच्या प्रवेशाने हि लोण्याने बनवलेली मूर्ती वितळू शकते.
यात्रेत उत्सवाच्या दिवशी भरणात महाराजा मंदिरावर लाखो भाविक नवस करण्यासाठी येतात. येथील भाविक भक्ताचा प्रसाद म्हणून त्यांना डाळ बट्टी चे जेवण दिल्या जाते. तसेच इथे बारा गाड्या ओढून म्हणजे या मध्ये सहभाग घेऊन लोक आपआपले नवस फेडतात.