आजचा हा लेख विशेषतः ग्रामीण भागात राहणार्या लोकांसाठी आहे.
कारण 2021 मध्ये भारतातील ग्रामीण लोकसंख्या (एकूण लोकसंख्येच्या %) 64.61% हे लोकवस्ती गावातील म्हणजे ग्रामीण भागात नोंदवली गेली आहे. (जागतिक बँकेच्या सर्वेनुसार )
महत्वाचे घटक
ग्रामीण भाग म्हणजे खेडे व प्रत्येक खेड्या गावात एक सरपंच असतो म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच असतो. आणि त्यांच्याबरोबर काही अधिक महत्वाचे घटक देखील गावाच्या प्रश्न सोडवण्यास सरकार नेमणूक करते; याची माहिती खालील प्रमाणे.
१. पगारी कर्मचारी
जिल्हा निवड समिती च्या माध्यमातून इथे कर्मचारी निवड होते व त्याला सरकार त्याला पगार देते. त्यामध्ये १.१ ग्रामसेवक : हे ग्रामीण विकासासाठी काम करतात आणि १.२ तलाठी जे महसूल विभागाशी संबंधित काम करतात
२. मानधन घेऊन काम करणारे कर्मचारी :
जसे कि त्यांना मानधन दिल्या जाते व ते कर्मचारी देखील गावासाठी काम करतात २.१ अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस २.२ पोलीस पाटील २.३ कोतवाल या कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या विभागाकडून मानधन दिला जातो जसे की पोलीस पाटील यांना गृहविभाग तर कोतवालांना महसूल विभाग मानधन देतो.
३.आशा वर्कर,रोजगार सेवक
हे स्वतः पुढाकारपुढाकार घेतात आणि मग त्यांना जेवढे काम तेवढे वेतन दिले जाते. याना पगार किंवा मानधन नसते.
४. ग्रामपंचायत मध्ये काम करणारे
यामध्ये शिपाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी लिपिक सफाई कर्मचारी यांचा समावेश होतो. आता गावच्या लोकसंख्येनुसार किती कर्मचारी नेमायचे व त्यांचे काम कोणते, त्यांना किती पैसे द्यायचं याचा निर्णय गावाचा असतो तो ग्रामसभा मध्ये घेऊ शकता.
ग्राम च्या अधिक बातम्या इथे वाचा
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
- काय आहे थायरॉईड ? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh Thyroid test normal range in marathi )
- डोळ्यांची ताप साथ सर्वीकडे पसरतेय – मुंबई पुणे नागपूर , काय करणार उपाय जाणून घ्या : Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu, know more in marathi
- महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)
पंचायत वेब सिरीज मध्ये तुम्ही कदाचित पहिला असेल कि तो सचिव ग्रामपंचायत मध्ये राहतो आणि गाववाल्या लोकांसोबत काम करतो त्यांचे कार्यालय मध्ये बसून तसेच गरज पडेल तिथे पण तो जातो.
सांगायचं असे कि पगारी कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मुख्यालय म्हणजेच त्याच्या गावात काम करतात त्या गावात थांबणं आवश्यक असतं म्हणजे तिथेच वास्तव्याला असणे गरजेचे असते.
त्यासाठी त्यांना प्रति महिना काही रक्कम घर भाडे तर वेगळा प्रवास खर्च दिला जातो.
पण ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकच उपस्थित नसतात अशावेळी सामान्य माणूस काय करू शकतो?
ग्रामसभेमध्ये तुम्ही जो कर्मचारी गावात राहत नाही व कोणते राहतात ते सांगू शकता. न राहणाऱ्या कर्मचाऱ्याला घर भाडे दिल्या जाणार नाही.
हालचाल रजिस्टर काय आहे :
जर एखादा कर्मचारी गावात राहत नसेल तर तसे त्याला हालचाल रजिस्टर मध्ये त्याची नोंद करावी लागते. यावरून तो नसेल तर त्या हालचाल रजिस्टर कोण ग्रामसेवक नेमके कुठे गेले हे आपल्याला कळू शकतं तो कधी आला त्याची नोंद तसेच कोठे गेला याची सुद्धा नोंद येथे करावी लागते.
तुम्ही कश्या पद्धतीने गाव विकासासाठी काम करू शकता :
गावात वेगवेगळ्या ग्रामविकास समिती असतात यामध्ये त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता, जसे कि,ग्राम पाणीपुरवठा,ग्राम स्वच्छता , पोषण आहार समिती, शाळा व्यवस्थापन या मध्ये सहभागी होऊ शकता. त्याच बरोबर तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी असे कर भरून गावाचे विकासात हातभार लावू शकता.
तुम्ही तुमची तक्रार कोणाकडे आणि कशी करू शकता :
तुम्ही ग्रामसभेला उपस्तित राहून प्रश्न विचारू शकता आणि त्याचे उत्तर ग्रामसेवक व सरपंच देतील तसेच ते उपाययोजना करून तुमच्या तक्रारी नुसार तुम्हाला आवश्यक त्या कामाची रूपरेषा आखून काम सुरु करण्यात येईन जर तो प्रश्न योग्य असेल तर.
तोंडी सांगितलेले प्रश्न पूर्ण होतील याची शाश्वती नसेल तर तुम्ही ग्रामसभेच्या दोन दिवस आधी तुम्ही आपला प्रश्न लेखी स्वरूपात लिहून तो ग्रामपंचायत देऊ शकता त्याची पोचपावती घेऊ शकता त्यानंतर ते प्रश्न त्याचे उत्तर हे ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग मध्ये म्हणजेच सभेच्या नोंदवही मध्ये नोंदवला जाते ते गावातल्या कुठल्याही कामाविषयी असू शकते.
जर का तुम्हाला दुसऱ्या पर्यायाने पण उत्तर मिळत नसेल तर RTI (Right To Information ) माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय चा वापर करून त्या कामासंबंधीची माहिती मागू शकता.
तिसरं म्हणजे तुम्ही नियमितपणे कर भरत असाल तर दरवर्षी ग्रामपंचायतीला किती रक्कम जमा आहे याचे पत्र मागू शकता पैसे कश्यासाठी आलेत आणि कुठून आलेत आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायत यांनी कोणत्या कामावर खर्च केला हा सर्व जाब एक नागरिक विचारू शकतो.
इ-ग्राम अँप
तसेच हा मंजूर झालेला खर्च कोणत्या कामासाठी मागितला होता याची सर्व माहिती सरकारच्या वेबसाईट वर आणि केंद्र सरकारच्या ई-ग्राम या आप्लिकेशन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपण मोबाईल मध्ये हे अँप टाकून माहिती पाहू शकता.
हा लेख आपल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या नातेवाईकांना संबधीताना नक्की पाठवा.