आज ची माहिती खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत आपण ऍमेझॉन या वेबसाईट च्या माध्यमातून कसा स्वतःचा व्यवसाय करायचा ते. या मध्ये एवढ्या काही माध्यम आहे कि आपण घरी बसल्या पैसे कमवू शकतो तर जाणून घेऊया कसे ते.
ॲमेझॉन सुरवात कशी झाली ?
१९९४ मध्ये ऍमेझॉन या कंपनीची सुरुवात झाली सुरुवातीला त्यांनी पुस्तके विक्री पासून सुरुवात केली आणि आज हीच कंपनी लाखो प्रॉडक्ट्स विकत आहे. आणि जगामधली ईकॉमर्स मध्ये सर्वात लोकप्रिय नाव या कंपनीने केले आहे.
आज कंपनी स्वतः व्यवसाय करून इतरांना या व्यवसाय पासून स्वतःच व्यायवसाय कसा वाढविता येईन म्हणजेच business तो business (B२B ) आणि ग्राहकाला पण सेवा देते त्यालाच आपण (B२C ) असे म्हणतो. अस्या दोन्ही सेक्टर मध्ये मोठं काम केले आहे.
ॲमेझॉन कंपनी ही नेमकं काय करते
हि कंपनी भारताचं नव्हे तर संपूर्ण जगामध्ये स्वतःचे वस्तू विकते पण ती ह्या वस्तू बनवत नाही. तर ज्या ज्या देशात हि कंपनी काम करते त्या त्या देशातले व्यावसायिकांना हे आपल्या पोर्टल ला रेजिस्ट्रेशन करायला लावते आणि त्यांचे प्रॉडक्ट व त्याची माहिती आपल्या वेबसाईट ला ऍड करायला सांगते.
मग ऍमेझॉन वेबसाईट ला ग्राहक भेट देतात मग त्यांना ते प्रॉडक्ट आवडले कि ते ऑर्डर करतात आणि मग ऍमेझॉन त्या ज्याचे हे प्रॉडक्ट आहे त्या व्यवसायिकाला सांगते कि तुमच्या साठी हे एक ऑर्डर अली आहे या ग्राहकाचा हा पत्ता आला याना ते पॅक करून पाठवा.
त्या पद्धतीने तो व्यावसायिक त्या ग्राहकाला ती वस्तू पाठवतो आणि मग शिपिंग सर्व्हिस चे काम सुरु होते ते म्हणजे त्याला घर पर्यंत सामान पोहचवण्याचं असे करून ऍमेझॉन आपल्या शिपिंग पार्टनर सोबत मिळून ते सामान त्या ग्राहकाला पोहचवतो.
अस्या प्रकारे ते सामान ग्राहकाला दिल्या जाते यामध्ये ऍमेझॉन आपले स्वतःचे कंमिशन घेऊन बाकीचे पैसे त्या व्यावसायिकाला देते.
पण या ईकॉमर्स सोबतच ऍमेझॉन कंपनीचे बरेच अधिक काम आहेत त्याच्या द्वारे आपण पण पैसे कमवू शकता ते कसे जाणून घेऊया
ॲमेझॉन कंपनीमध्ये आपण पैसे कसे कमवु शकतो ?
१ Seller : ऍमेझॉन वर सेलर बनून
तुम्ही स्वतःला सेलर बनून आपले वस्तू ऍमेझॉन च्या वेबसाईट वरून विकू शकता यामध्ये तुम्हाला ऍमेझॉन चे असणारे सर्व ग्राहक या मध्ये मिळतील.
यासाठी तुम्हाला खाली गोष्टी लागतील
१. GST
२ . PAN
३. FASSAI जर आपले खाण्याचे वस्तू असेल तर
२. Amazon Flex :
तुम्ही इथे अँप्लिकेशन करून स्वतः एक डिलिव्हरी चे काम करू शकता आणि तासाला १२० ते २०० रुपये कमवू शकता. अधिक माहिती साठी तुम्ही ऍमेझॉन फ्लेक्स बद्दल माहिती शेअरच करू शकता.
३. Amazon Affiliate
प्रोग्राम मध्ये सामील व्हावे लागेल त्यानंतर कंपनायच्या वस्तूचा प्रचार करावा लागले जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या लिंकवर क्लिक करेल तेव्हा तो ती वस्तू २४ तासाच्य आत खरेदी करेल व त्यावर तुम्हाला प्रत्येक विक्रीवर तुम्हला काही टक्के १०% पर्यंत कमिशन मिळू शकते
४ Amazon Kindle
आपण जर पुस्तक लिहिण्यास उत्सुक असाल आणि तुम्हाला लिहायला आवडत असेल आणि तुम्हाला स्वतःचे बुक पब्लिश करायचे असेल. तर हि ऍमेझॉन ची सर्विस तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्ही तुमचे पुस्तक पब्लिश करू शकतात आणि त्याची विक्री पण ऍमेझॉन वर केल्या जाईन/
५ . Amazon Mechanical Turk (MTurk)
हा क्राउडसोर्सिंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ज्या व्यक्ती किंवा व्यवसायांना आपले काम हे पूर्ण जगातील स्किल्स असणाऱ्या लोकांकडून करून घेता येते. इथे त्यांना “टर्कर्स” म्हणून संबोधले जाते.
अधिक तुमच्यासाठी वाचायला
- महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)
- PMEGP – मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना Business Loan Scheme For Industries through – PMEGP
- Amazon -मधून घरी बसल्या पैसे कमवा जाणुन घ्या किती माध्यम आहेत . Learn How to earn Money using amazon services
- बम्पर भरती : स्टाफ सेलेक्टशन कमिशन 2023 च्या ७५०० जागा SSC CGL 2023 Notification PDF: Check Exam Date and how to apply Online SSC Form
- SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग योजना Free Coaching Scheme for SC and OBC Students
खालील कामाचा यामध्ये समावेश आहे
१. डेटा एंट्री
२. सर्वेक्षणांपासून
३. इमेज टॅगिंग
४. ट्रान्सक्रिप्शनपर्यंत ही कार्ये सोपी किंवा थोडे कठीण पण असू शकतात.
इथे आपण त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो व फक्त त्याच कामाचे आपल्याला पैसे द्यावे लागतील.
Worker Account : इथे तुम्ही तुमचे वर्कर चे अकाऊंट तयार करून तुम्ही वरून कामे करू शकता आणि पैसे सुद्धा कमवू शकता.
या पद्धतीचा अवलंब करून बरेच जण लाखो करोडो मध्ये पैसे कमवत आहेत. तर आपण सुद्धा यावर विचार करून नक्की या व्यवसायात येण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला नवीन सुरुवात करण्यासाठी आमचा लेख नक्की कमी येईन.
तुमच्या उज्वल भविष्या साठी खूप शुभेच्छा !!!