राज्य सरकाराने विद्यार्थानसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ५०० रुपये अनुदान देण्याचे ठरवले असून व तसेच बऱ्याच ठिकाणी करिअर मार्गदर्शन विविध भागात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी करिअर विषयी माहित घरापर्यंत पोहचता आली पाहिजे त्यासाठी मदत नंबर व ई-मेल वर तुम्हाला पडलेले करिअर विषयी प्रश्नं या सुविधांद्वारे घेऊ शकतात .
गेल्या बऱ्याच वर्षापासून औद्योगिक क्षेत्रामध्ये बदल झाले वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य या गोष्टी या कौशल्याचे प्रशिक्षण माहिती कुठे घ्यायची संस्था कुठे आहे.
प्रवेश कसा घ्यायचा प्रत्येक अशा गोष्टी असतात की ते आपल्याला माहीत नसतात म्हणूनच आजच्या पिढीसाठी नवीन नवीन माहिती व्हावी यासाठीच कौशल्य विकास विभागाने नियोजन केले आहे.
राज्यामध्ये सहा महिने सहा जून मध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित केले आहे
शिबिर नेमके कशासाठी?
विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर बद्दल माहिती मिळण्यासाठी व त्यामधून त्यांचं करिअर चांगल्या क्षेत्रामध्ये घडावे यासाठी शिबिर ठेवण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थी व पालक विद्यार्थी व पालक यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे त्यांना पटवून देण्याची काम या शिबिरामध्ये केले जाईल व तसेच शहरी भागातील व खेडेगावातील मुला मुलींसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे
शिबिराचे आयोजन
या शिबिराचे आयोजन कौशल्य विभागामार्फत असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालय यामार्फत राज्यातील सर्व जिल्हे व 288 विधानसभा मतदार संघामध्ये छत्रपती शाहू महाराज युवा करिअर या शिबिराचे आयोजन केले.
कुर्ला डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन केले व राज्यस्तरीय उपक्रमाचा मंत्री लोढा यांच्या मार्फत करण्यात आला . कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, डॉन बॉस्को संस्थेचे संचालक फादर अँथनी पिंटो, माजी नगरसेवक हरीश भांदिर्गे सर्व शिबिरामध्ये उपस्थित होते.