माहीत नाही
कसल्या अभावित दुखा:चे बिज
ठेवले आहे झाकुन
अंत:स्थलाच्या मडक्यात
अंकुरतच जाते
करपत नाहीच कधी.
रात्रीचा शो संपऊन
विदुषक परतत असेल जेव्हा,
तेव्हा तो धाय मोकळून रडत असेल काय?
एकटाच आपल्या तंबूत.
हे काळे ढग,
ही धुक्याची गर्द दुलई,
हे सोहळे,
चमचमीत चकचकीत कैफाचे हे सागर
तहानलेल्या ययातीचे जणू सारेच वंशज.
ही मेंदूतल्या
इनबिल्ट रसायनांची कोरीओग्राफी की,
विद्युत लहरींचा मायावी खेळ?
हे हजारो बॅरीअर्सचे रस्ते
गुंतागुंतीचे, भुलवनारे
की जन्मानेच लादलेले पाश?
निलेश हेडा,कारंजा