Headlines

निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi

??निसर्ग रडतो ??


माणुसकीचा धर्म बुडाला
फसवणारांचा सुळसुळाट वाढला
धर्माच्या गुंगीत ढकलून
लुटारु लुटू लागला


बहुजन अज्ञानात रूतू लागला
हक्क अधिकार जाणून
घेण्यात रस नाही उरला
धर्माच्या नशेत
हक्क अधिकार विसरू लागला


जाती धर्मात तेढ वाढला
माणूस माणसाचा द्वेष करु लागला
बहुजन त्याला
चांगले दिवस म्हणू लागला


शेटजी भटजी
महागाईचा वणवा पेटवू लागला
बहुजन होरपळून गेला
टाळ्या थाळ्या दिवे
लावून नाचू लागला


अध्यात्माच्या जगात हरवून
अल्प संतुष्ठी झाला
संविधानात विकास
त्यालाच विरोध करू लागला
म्हणून निसर्ग रडुन
आपला शोक व्यक्त करु लागला



रचना :- अशोक शंकर नागकीर्ति
दिनांक :- २१/३/२०२३
मोबाईल :- 7039120462


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *