माझा महाराष्ट्र
जिजाऊ,शिवाजी
एक एक पाजी
मावळा तो… १
पावन सह्याद्री
पावन तो बाजी
संताजी,तानाजी
मर्द गडी.. २
इतिहास घडे
वर्तमान झुके
जुलुमांचे मुके
शौर्य,ध्येर्य… ३
भवानीची कृपा
प्रसन्न शिवाई
शत्रूंची ही बाई
आई माझी… ४
तलवारी संगे
स्वराज्याची भाषा
स्वातंत्र्य मनिषा
चेतलेली.. ५
तो गनिमी कावा
वाघासम शक्ती
भक्त आणि भक्ती
शिवबाची… ६
शंभराला भारी
एकची मावळा
संसार सोहळा
स्वराज्याचा…७
◼️◻️◼️
स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.
रामहरी पंडित ©
( चंद्रांशू)
कारंजा जि.वाशिम
संवाद ९७६५०११२५१