शेतकऱ्यांना चांगला निधी देऊन सरकारने खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. २९ हजार कोटींचा तरतूद करून. सध्याच्या झालेल्या हवामान बदलाने बऱ्याच शेतकऱ्याचे हातचे आलेले पीक मुकावे लागले तसेच अजून हि शेतकरी दरवर्षी कर्ज काडून थकलाय अन आता त्यांना यामंजूर केलेल्या २९ हजार कोटी ची आशा आहे कि हे लवकर त्यांना आधार देण्यास तयार होतील आणि शेतकरी मोठ्या उल्लासाने पेरणी पकडतील .
सोबतच शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा आणि ६ हजार रुपये सन्माननिधी राज्य सरकार आणि ६ हजार निधी केंद्र सरकार अशी घोषणा शिवसेना भाजप सरकारने गुरुवारी करून शेतकऱ्यांना धीर दिला असे दिसत आहे .
त्याचप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना आता वर्षांला १२ हजार रुपये मिळणार आहेत.
आधीच्या पीक विमा साठी शेतकऱ्यांना २ टप्प्यात पैसे मोजावे लागत होते ते आता सरकार देणार आहे त्यामुळे त्याची रक्कम आता १ रुपये होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा या सरकार कडून भेटला आहे. याची रक्कम ३३१२ कोटींचा भार राज्य सरकार उचलणार आहे.