महाराष्ट्र भूमी अभिलेख नवीन GR आला आहे .
जर तुमच्याकडे वडिलोपार्जित जमीन आहे तर ती फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तुमच्या नावावर करता येईल. प्रक्रिया आणि अर्ज कोठे करावा याबद्दल संपूर्ण तपशील येथे आहेत. वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर कशी हस्तांतरित करावी. तसेच शेती कशी नावाने करावी याबद्दल अधिक जाणून घेऊया.
वडीलोपार्जित शेती नावावर करायला खूप त्रास होतो बऱ्याच वेळेला लोक एकदम परेशान होतात कारण त्यामध्ये लागणारे कदपत्रे आणि पैसे सोबत वेळ पण निघून जातो.
आणि आपण या कामासाठी मग टाळाटाळ पण करतो पण वेळेवर जर हे काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला तुमची वडीलोपार्चित शेती गमवावी लागु शकते.
या सर्व समस्या टाळण्यासाठी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय (GR) नेमका काय आहे. आणि जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येईल. हि सर्व माहिती या लेखामध्ये दिली आहे. तर हा लेख तुमच्यासाठी गरजेचं आहे.
कलम 85 काय आहे
या अधिकारानुसार तहसीलदारांनी हे अधिकृत स्टॅम्प पेपर पत्र व शंभर रुपयांच्या शिक्क्यावर लिहून देण्यास हरकत नाही अशी सूचना आहेत. महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम 85 नुसार, महाराष्ट्र सरकारने अशी (शेत नवावर क्रेन) वडिलोपार्जित जमीन हस्तांतरण प्रकरणे तहसीलदारांमार्फत तात्काळ निकाली काढावीत. असे निर्णय दिले गेले आहेत.
हि माहिती यासाठी महत्वाची आहे कारण खेडी गावातील बरेच तरुण मधामध्ये जे वाईंडर लोक असतात त्यांच्याकडे जाऊन काम करतात त्यामुळे माहिती नसल्या कारणाने त्यांना वेळेचे आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
वडिलोपार्जित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकतात? How many generations can claim ancestral property?
अविभाजित किंवा वर्गीकृत वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत, पुरुष्याच्या चार पिढ्यांवर त्यांचा हक्क मागु शकते. म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा आणि पणजोबा-वडील यांना वारसाहक्काने मिळवलेल्या अविभक्त मालमत्तेवर वारसा हक्क असतो.
महिलांचा हक्क वडीलोपार्जित संपत्ती वर :
महिलांना १९५६ कायद्याच्या आदी , स्त्रियांना विवाहानंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळत नव्हता कारण त्यांना त्यांचे वारस हक्कदार मानले जात नव्हते. जुन्या कायद्यांनी मुळात स्त्रियांना दर्जा नाकारला होता. डॉ बाबासाहेबांच्या संघर्षयाने १९५६ ला हिंदू कोड बिल हाच १९५६ कायद्या अंतर्गत आता महिलांना हक्क मिळतो .
हिंदू वारसा (सुधारणा) कायदा,
हिंदू वारसा (सुधारणा) कायदा, 2005 द्वारे उत्तराधिकार(वारसा) कायद्यात सुधारणा केल्यानंतर, महिलांना सहप्रवाह (वारस )म्हणून स्वीकारण्यात आले आहे. आता, दोघेही, मुलगे आणि मुली, कुटुंबात वारस आहेत आणि मालमत्तेवर समान हक्क आणि दायित्वे करतात. तसेच त्यांना शेतजमिनीवर सुद्धा महिंलांना वारस हक्क दिल्या जाते.
हि माहिती आपल्या मित्र व परिवारापर्यंत पोहोचवावा .