Headlines

अंटार्क्टिका: या जागेबद्दल जाणून घ्या सर्व रहस्य तथ्य Antarctica: All the Secret Facts to Know, Why it’s called a desert

antarctica : its secrets Why it's called a desert

अंटार्क्टिका हा अत्यंत थंड महाद्वीप आहे, पृथ्वीवरील सर्वात थंड द्वीप त्याला म्हणता येईन, तसेच इथे खूप मोठ्या प्रमाणात कोरडी वारा सुरु असते. जवळपास हे क्षेत्र 14 दशलक्ष चौरस किलोमीटर मध्ये व्यापलेला आहे . याला पाचवा सर्वात मोठा खंड देखील म्हणतात. एवढे भयानक वातावरण असूनही, अंटार्क्टिका हे वैज्ञानिक संशोधन आणि शोधाचे केंद्र आहे.

हा खंड कसा तयार झाला ?

जेव्हा ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि भारत हे भूभाग वेगळे होण्यास सुरुवात झाली तेव्हा पासून हा अंटार्टिकाचा भाग तयार होण्यास सुरुवात झाली. आणि हळू हळू तो नवीन खंड तयार झाला. सुमारे २५ दशलक्ष वर्ष पूर्वी हे झाल्याचे संशोधनाचे अंदाज आहे. १८२० मध्ये फॅबियन गॉटलीब फॉन बेलिंगशॉसेन आणि मिखाईल लाझारेव्ह यांच्या नेतृत्वाखालील रशियन मोहिमेद्वारे हा खंड प्रथम दिसला आणि नंतर ब्रिटीश संशोधक एडवर्ड ब्रॅन्सफील्डने त्याचे नाव दिले.

इथे कोणता व्यवसाय केला जातो

हा असा पुर्थीवरचा खंड आहे कि इथे कायमचे मनुष्य रहिवाशी नाही पण येथील खंडाचा जमीन भाग घेण्यास ताबा बऱ्याच देशांनी घेतला आहे.

पण इथे बरेच च्या देशाची संशोधन केंद्रे इथे आहेत ते येथील वातावरण आणि येथील प्रजाती वर संशोधन करत आहे. सुमारे ८० वैज्ञानिक तळ आहेत जे विविध देशातील संशोधन केंद्रे आहेत, यामध्ये युनायटेड स्टेट चा मॅकमुर्डो स्टेशन आहे. तसेच भारताचे भारती संशोधन केंद्र.

खंड कसा चालतो

हा खंड अंटार्क्टिक करार पद्धतीने चालते , ज्यावर 1959 मध्ये 12 देशांनी स्वाक्षरी केली होती आणि त्यानंतर 54 देशांनी त्याला मान्यता दिली आहे. हा करार सांगतो कि शांततेने येथील कारभार चालेल आणि इथे कोणतेही लष्कर जमा करून कार्यवाही करता येणार नाही.

अंटार्तिकाचे भविष्य

अंटार्टिका चे भविष्य मध्ये हे येथील पर्यावार्नातील पृथ्वीवर होणारे बदल समजण्यास मदत होते आणि त्यावरून संशोधकांना महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होईन . तसेच उपाययोजना करता येईन.

याला बर्फाचा वाळवंट का म्हंणतात ? Why it’s called a desert:

बर्फाने पूर्णपणे झाकलेला हा खंड आहे पण इथे फारच कमी पाऊस पडतो म्हणजे २ इंच पेक्षा पण पाऊस पडतो आणि पाऊस पडला कि तो लगेच बर्फामध्ये बनल्या जातो. त्यामुळे पाण्याचं तसे प्रमाण इथे नाही तसेच इथे २०० किलो मीटर च्या वेगाने इथे वारे असतात या करणारे याला वाळवंट म्हणतात.

जीवन living things :

हा एवढा थंड कि इथे माणसाला जिवंत राहणे खूपच संघर्षमय आहे कारण येथील सरासरी तापमान -57°C असते हिवाळ्यात किमान तापमान -90°C असते तसेच उन्हाळयात तापमान -2°C आणि 8°C दरम्यान पोहोचू शकते.

तसे असता बरेच संशोधक आणि इतर त्याच्या सोबत येणारे इथे बरेच दिवस इथे राहतात त्यासाठी ते काही स्टेशन बनवतात त्या मध्ये त्यांना जास्त आत मध्येच सर्व सुविधा घेऊन राहावे लागते.

तसेच इथे काही भागात इतर प्रजाती आजही राहतात या मध्ये २०० पेक्षा जास्त प्रजाती मोजल्या गेल्या आहे. त्यापैकी काहींची नवे खाली दिली आहे

  • पेंग्विन
  • अल्बट्रॉस
  • अंटार्क्टिक ऑर्का
  • निळा देवमासा
  • राजा पेंग्यून
  • बिबट्या सील
  • मिंके व्हेल

आणखी असे बरेच नवे आहेत इथे आम्ही काही मोजके नवे दिली आहे.


इथे अधिक माहिती वाचा

आता अंटार्क्टिका ही मानवनिर्मित संशोधन करणारी जागा झाली आहे. इथे हवामान बद्दलचा होणार बर्फावर परिणाम तसेच भौतिशात्र अभ्यास तसेच यापासून इतर भूखंडावर होणारे त्याचे परिणाम ये शोधण्यास येथील संशोधना ला मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *