Headlines

भारतीय लोकशाहीची महत्वाची माहिती: राष्ट्रीय आणि राज्य पक्ष कसा बनतो आणि पंचायत रचना Important Information on Indian Democracy: How National and State Parties are Formed and Panchayat Structure Explained

mportant Information on Indian Democracy: How National and State Parties are Formed and Panchayat Structure Explained in marathi

जसे आधीच्या काळात एकच निर्णय घेणारा असायचा तो म्हणजे राजा. राजाने दिलेला आदेश सर्व परी असायचा. त्याला बदलविण्याचा विचार करू शकत नव्हते. आणि राजा म्हणजे सर्व श्रेष्ठ आणि त्याची श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्मावरून ठरायचं. त्याने राजांच्याच घरात जन्म घेतलेला असलायला पाहिजे. अन्यथा तो कितीही जनतेच्या भल्या साठी काम करत असेल तो राजा बनु शकत नव्हता. 

आपण आता लोकशाहीत राहतो भारतीय लोक हे प्रमुख आहेत पण नेमके लोकशांही काय आहे. येथे सर्व प्रथम लोक येतात म्हणजे तुम्ही आणि मी व इतर. मग येते त्यांच्या साठी राज्यकारभार करणारी लोक ते लोक सर्वसामान्य लोक मधूनच तयार होतात. ते तयार करणारे ते पण लोकच असतात. लोकच लोकांना निवडून देतात आणि मग ते लोक या बाकी लोकांचे नायक म्हणून त्याच्या साठी काम करतात. त्यालाच आपण लोकांचे प्रतिनिधी म्हणतो . 

निवडून देण्याच्या प्रक्रियेला निवडणुका म्हणतात.

निवडणुका: 

भारताची लोकशाही टिकवण्यासाठी लोकांना हक्क देते आणि लोक हे भारतातील त्यांचे नायक प्रतिनिधी या निवडणूक माध्यमातुन निवडुन देतात. 

कोणती यंत्रना काम करते

ये सर्व सांभाळण्यासाठी ECI Election commision of India याची स्थापना केली यालाच आपण भारतीय निवडणूक आयोग असे म्हणतो. हि पंचायत  (स्थानिक ), राज्य (विधानसभा ), राष्ट्रीय (लोकसभा ) स्तरावर निवडून घ्येनाचा प्रोग्राम राबवते. या निवडणूका या संविधानिक पद्धतीने पार पडण्याची जिम्मेदारी हि या संस्थे कडे असते. 

या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होऊ शकते?

दोन पद्धतीने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येऊ शकतो 

१. पक्ष

२. अपक्ष

पक्ष आणि अपक्ष असे दोन्ही निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात आणि निवडणूक लाडवण्यासाठी उमेदवार उभे करू शकतात.

अपक्ष स्वतंत्र उमेदवाराला काही पात्रता पूर्ण करावे लागते जसे कि

१. तो भारताचा नागरिक असावा.

२. लोकसभा साठी तो २५ वय वर्ष त्याचे पूर्ण असावे

३. कोणती गुन्हेगारी शिक्षा त्याला झालेली नसावी

पक्ष आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवू शकतात त्याच्या काही अटी असतात. खालीलप्रमाणे

१. पक्ष नोंदणी झालेली असावी

२. गटामध्ये कमीत कमी १०० सदस्य आवश्यक

३. भारतीय निवडणूक आयोग (ECI ) ने दिलेल्या नियमाचे त्यांनी पालन करावे

राष्ट्रीय आणि राज्य पक्ष

पक्ष हे राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असे असतात राष्ट्रीय पक्ष करण्यास तो राज्य पक्ष असला पाहिजे मग तो राष्ट्रीय पक्षाचा कसा आणि कोणाकडे दावा करू शकतो ते पाहूया,

हे काम कोण करते ?

पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता देण्याचे काम हे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) हे करते आणि त्यासाठी काही नियम व अटी आहेत त्या जर पूर्ण होत असेल तर राष्ट्रीय पक्ष हि मान्यता देण्यात येते. 

चला तर पाहूया हे नियम काय असतात.

खाली दिलेल्या अटींपैकी एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

१. लोकसभा आणि राज्यातील विधानसभा याच्या निवडणुका मध्ये या पक्षाच्या उमेदवाराला (मिळून उमेदवारांना ) चार किंवा अधिक राज्यामध्ये ६% मते मिळाली पाहिजे. 

किंवा 

२. पक्षाने सर्वीकडे होणाऱ्या निवडणुकीत वेगळ्या राज्यातून कमीत कमी २% जागा जिकल्या पाहिजे म्हणजेच सध्याच्या आकडेवारी नुसार ११ सीट तो पक्ष जिंकायला पाहिजे  

किंवा 

३. चार राज्यात पक्षाला राज्यस्तरीय  पक्ष म्हणून मान्यता.

सध्या भारतात सात मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत.

१. भारतीय जनता पक्ष (भाजप)

२. इंडियन राष्ट्रीय काँग्रेस (INC)

३. बहुजन समाज पक्ष (BSP)

४. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)

५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)

६. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआय(एम))

७. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC)

आता हे पण लक्षात घ्यायला पाहिजे कि हे निर्णय ECI द्वारे घेतल्या जाते आणि काही अटींची पूर्तता जर एखादा पक्ष करत नसेल तर त्याच्या पक्ष्याच्या राष्ट्रीय दर्जा जाऊ पण शकतो. 

सध्याच्या शिवसेना कोणाची ? हा वाद भारतीय निवडणुक आयोग यांनी पाहिला होता पण उद्धव ठाकरे ECI ने दिलेल्या निर्णयावर नाखुश असल्याकारणाने ते न्यायालया कडे न्याय मागायला गेलेत.

नाखुष पक्ष व व्यक्ती ECI च्या विरोधा मध्ये तो न्यायपालिकेकडे न्याय मागू शकतो. 

निवणुकी निवडुन येणाऱ्या लोकांकडे म्हणजे बाकी लोकांच्या प्रतिनिधी कडे सत्ता येते म्हणजे येथील नगर मध्ये कोणते नियम लावायचे अमलात आणायचे हे प्रतिनिधी ठरवते. 

हि सत्ता तीन पातळ्यांवर काम करते

१. संघशासन केंद्र शासन :

केंद्र शासन  नेतृत्व करणारा हा  प्रधानमंत्री असतो , त्याची  नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. विविध मंत्रालये आणि विभाग मिळुन केंद्र शासन चालवल्या जाते.

जसे कि संरक्षण, परराष्ट्र धोरण, वित्त आणि राष्ट्रीय इतर खाते व त्याचे कार्यकारी हे मंत्री असतात. 

२. राज्यशासन

भारत एक संघराज्यीय देश आहे ज्यामध्ये दोन-स्तरीय शासन प्रणाली आहे: केंद्र सरकार (केंद्र सरकार) आणि राज्य सरकारे. त्यालाच आपण राज्यशासन असे म्हणतो. 

या शासनाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो  राज्याची सरकार हि मुख्यमंत्री याच्या नेतृत्वाखाली चालते. भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची स्वतंत्र विधानसभा असते ज्यामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असतात स्वतः मुख्यामंत्री निवडून आलेला प्रतिनिधी असतो.  आणि कार्यकारी प्रमुख हे  विधानसभेने पारित केलेले कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहेत

३. स्थानिक शासन

यालाच आपण तिसरी श्रेणी शासन असे म्हणतो . भारतमध्ये पहिले आपण पहिले ते केंद्र सरकार , दुसरे ते राज्य सरकार आणि राज्य सरकार नंतर येते ते म्हणजे स्थानिक सरकार हि आहे तिसरी श्रेणी. तळागाळातील लोकांना आपल्या लोकं साठी काम करता यावे म्हणून भारतात स्थानिक स्वराज्य प्रणालीची सुरुवात करण्यात आली.

आता हि स्थानिक शासन हि पण ३ श्रेणी मध्ये काम करते. ते कसे ते पाहूया.

१. सर्वात पहिली श्रेणी जिल्हा परिषद (जिल्हा परिषद):

जिल्हा याचा प्रमुख हा अध्यक्ष असतो आणि तो जिल्हा परिषद चालवितो म्हणजे जिल्याच्या सर्वागीण विकासासाठी जिल्हा परिषद जबाबदार असते. 

त्याचबरोबर त्या जिल्ह्या मध्ये विविध विकास कार्यक्रम करण्याचा आणि योजनांची अमल करणे आणि कामावर देखरेख करणे हे या जिल्हा परिषदेचे कामे असतात. 

२. दुसरी श्रेणी मध्ये पंचायत समिती (मध्यवर्ती किंवा ब्लॉक स्तर):

यालाच ब्लॉक असे म्हणतात कारण हा ग्रामपंचायत तसेच जिल्हा दोंघांना जोडणारा दुवा आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांचा मध्यवर्ती स्तर असे देखील म्हणतात. 

याचा प्रमुख हा अध्यक्ष (सभापती) असतो तो  पंचायत समितीच्या सदस्यांद्वारे निवडलेले सभापती असते.

त्यामध्ये बऱ्याच गावातील ग्रामपंचायत, एका ग्रामपंचायत मध्ये एक व अधिक गवे असू शकतात.  पंचायत समिती त्यांच्या ग्रामपंचायत (समूह) क्षेत्राच्या विकासासाठी विविध कार्यक्रम आणि योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. 

३. ग्रामपंचायत (गाव पातळी):

इथे खेडे गावाचा समावेश असतो आणि याला गावाचे लोक गावातील लोकांना निवडून आणून त्यांच्यासाठी प्रशासन तयार करते. आणि ते पाणीपुरवठा , स्वच्छता , कचरा नियोजन यासारखे मूलभूत सेवा पुरवण्यासाठी तसेच सुव्यवस्था राबवतात. 

ग्रापंचायतीचं प्रमुख हा सरपंच असतो आणि पंचायतीने घेतलेल्या  निर्णयाची अंमलबजावणी करण्यास जबाबदार असतो. 

अश्या पद्धतीने भारतीय लोकशाही हि लोकांच्या माध्यमातून लोकांना निवडून लोकांसाठी कार्य करते. भारतातील लोकशाही हि पूर्णपणे भारतीय संविधानाला अनुसरून कार्य करते. म्हणून भारतामध्ये एवढे वेगळे वेगळे धर्म , पंथ , समुदाय , कित्येक जाती आणि कित्येक पोटजाती असून देखील भारत देश एक आहे. विविधतेत एकता ली या लोकशाहीची ओळख जगात आहे. आणि भारताला एवढ्या मोठ्या देशाला असे संविधान लाभणे हे आपले सौभाग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *