समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी आणि त्यांच्या जगण्याचा दर्जा वाढविणायसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
या माध्यमातून त्याच कला कौशल्य वाढविण्यास मदत होईन व त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईन.
हे योजना SC आणि OBC आणि अल्पसंख्यकाणा विनामूल्य शिकवणी देण्याची आहे. हि योजना सप्टेंबर २००१ पासून सुरु केली आहे.
योजनेचे उद्देश
चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या मागास आणि अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागास
वर्ग (ओबीसी) उमेदवारांना स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी व त्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी यामागील उद्देश आहे.
कोणत्या कोर्सेस ला कोचिंग मिळणार
१. UPSC, कर्मचारी निवड आयोग (SSC) आणि विविध रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे आयोजित गट A आणि B परीक्षा.
२. MPSC चे कोचिंग गट A आणि B साठी
३. बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) द्वारे आयोजित अधिकारी श्रेणी परीक्षा.
४. IIT-JEE आणि AIEEE सारख्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रीमियर प्रवेश परीक्षा, AIPMT सारखे वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की व्यवस्थापन (CAT सारखे) आणि कायदा (CLAT सारखे) आणि मंत्रालयाने ठरविलेले इतर विषय.
५.SAT, GRE, GMAT आणि TOEFL सारख्या पात्रता चाचण्या/परीक्षा.
या वरील सर्व स्पर्धा परीक्षा तसेच प्रवेश परीक्षा या सारख्या शिकवणीचा या मध्ये समावेश आहे. यासाठी लाखो रुपयांमध्ये फीस मोजावी लागते. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त मुलं मुलींनी फायदा घ्यावा.
SC OBC मोफत कोचिंग योजनासाठी पात्रता
१. SC आणि OBC मधील विद्यार्थी, ज्यांचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न 8.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे.
२. अर्जकर्ता हा अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, ओबीसी सर्वगातील असावा.
३. या योजनेंतर्गत निवड झालेले विद्यार्थी सर्व वर्गांना उपस्थित राहणे अनिवार्य .
४. विद्यार्थ्याने 15 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेतल्यास त्याला/तिला कोचिंगमधून बंदी घातली जाईल व इतर लाभ मिळणार नाही.
अर्ज कसा करावा
१. सर्वप्रथम, SC OBC मोफत कोचिंग योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर coaching.dosje.gov.in जा.
२.यानंतर वेबसाइटचे होमपेज तुमच्या समोर उघडेल. मुख्यपृष्ठावर, लॉगिन पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
३. तेथील रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा तुमचे नाव आणि पासवर्ड बनवा
४.नंतर तुम्ही लॉगिन पेज वर परत येऊन लॉगिन करा आणि आपल्याला कोणत्या अभ्यासक्रम करायचा आहे ते निवड
अधिक माहिती
अधिक माहिती साठी या संकेतस्थळाला भेट द्या : coaching.dosje.gov.in