TAIT निकाल 2023 महाराष्ट्र :
महाराष्ट्रातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) आज कधीही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) निकाल 2023 जाहीर करू शकते. परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार परिषदेच्या अधिकृत वेबसाइट www.mscepune.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात.
याप्रमाणे महा TAIT निकाल 2023 तपासा-
१. सर्वप्रथम www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. २. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील TAIT निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा. ३. आता उमेदवार त्यांचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील टाका. अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे निकाल चेक करू शकाल . ही परीक्षा फेब्रुवारी 22, 23, 24, 25, 26, 27, 28, मार्च 1, 2 आणि 3, 2023 रोजी घेण्यात आली होती. TAIT परीक्षा 200 गुणांसाठी घेण्यात आली होती. निकालामध्ये सर्व उपस्थित उमेदवारांसाठी त्यांच्या रोल नंबरसह परीक्षा मध्ये भेटले ले मार्क्स आहेत.