सोयगाव प्रतिनिधी :
दिनांक ९ मार्च २०२३ ला छत्रपती संभाजी नगर जिल्हा गटप्रोतक व आशा सेविका आरोग्य कर्मचारी युनियन सिटी संघटना संभाजीनगर यांच्यावतीने सोयगाव बचत भवन येथे अशा सेविकांना किमान वेतन लागू करण्यात यावे किमान वेतन 26000 लागू करन्यात यावा म्हणून दिनांक 9.3.2023 गुरवार येथे मेळावा आयोजित केला होता.
यामध्ये संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड दामोदर मानकापे सरचिटणीस मंगलाताई ठोंबरे जिल्हा कमिटी सदस्य सविताताई सुरडकर गटप्रोतक प्रज्ञाताई मोरे वंदनाताई करपे सुवर्णाताई राजपूत तालुक्यातील सर्व अशा सेविका उपस्थित होते.
कामगार संघटना तालुका प्रतिनिधी सुरेश पुसे शालेय पोषण कामगार रामेश्वर भाऊ शिरसाट स्वच्छता कर्मचारी नगरपंचायत कामगार उपस्थित होते.