Headlines

Oscar Awards 2023 : RRR सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर तर द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी winner of Oscar award – 2023

स्पर्धा परीक्षा साठी महत्वाची बातमी आहे.

Oscar award 2023 :

RRR सिनेमाने इतिहास रचत ९५ व्या अकादमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. ९५ व्या अकादमी पुरस्कार मध्ये RRR सिनेमा चे गाणे नाटु-नाटु या गाण्याला ओरिजनल साँग (मूळ गाणे) म्हणून ऑस्कर मध्ये विजयी झाले.

त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये याचं जल्लोष हर्ष केला जात आहे आणि तेलगु सिनेमाला तसेही संपूर्ण भारतात तर नाव केलेच पण आता संपुर्व देशात त्यांनी तिरंगा फडकावला.

तब्बल १४ वर्ष नंतर भारता मध्ये म्हणजे ए.आर. रहमानने 2009 मध्ये संगीताच्या विश्वात भारताचे नाव उंचावले 81 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात दोन ऑस्कर मिळाले होते.

याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार आणि एक जय हो साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर पुरस्कार.



आणि आता आज दिनांक १३ मार्च २०२३ ला दोन खुशखबरी भारताकडे आहे आणि भारतीय चित्रपटाने दाखवुन दिले कि आपल्या मधील प्रतिभा हि काही कमी नाही . चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानल्या

जाणार्‍या ऑस्कर 95 व्या द अकादमी पुरस्कारांमध्ये भारताने दोन ऑस्कर जिंकले.

१. SS राजामौली यांच्या RRR चित्रपटातील Naatu Naatu या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे

२. दुसरा पुरस्कार हा भारतातील माहितीपट(documentary ) ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट प्रकारात कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांच्या Netflix च्या 'द एलिफंट व्हिस्परर'ला मिळाला . 

निर्माते गुनीत मोंगा हे होते, यांनी कार्तिकी गोन्साल्विस तिचे कुटुंब यांचे आभार मानले आणि हा विजय तिच्या "मातृभूमी भारत" ला समर्पित केला.

हा समारोह हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये 12 मार्च 2023 रोजी 95 वा अकादमी पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये १३ मार्च २०२३ रोजी

८.०० सकाळी (भारताच्या वेळेनुसार ) वाजता एलिफेंट व्हीस्परर्स ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटासाठी ऑस्कर

आणि ८.२५ मिनीटांनी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग चा ऑस्कर SS राजामौली यांच्या RRR चित्रपटातील Naatu Naatu या गाण्याला देण्यात आला.

काय आहे हे ऑस्कर पुरस्कार ?

ऑस्कर अकादमी पुरस्कार, ज्याला ऑस्कर म्हणूनही ओळखले जाते, हा अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) द्वारे दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांसह चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांच्या उत्कृष्टतेला ओळखण्यासाठी दिला जाणारा सन्मान आहे.

थोडी माहिती ऑस्कर च्या इतिहासाची :

  • पहिला अकादमी पुरस्कार 16 मे 1929 रोजी सुरू झाला.
  • हे हॉलीवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये झाले, एका खाजगी डिनर पार्टी मध्ये हा पहिला अकादमी ऑस्कर पुरस्कार घेण्यात आला होता.
  • या मध्ये सुमारे 270 लोक उपस्थित होते.
  • AMPAS तर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
  • हे सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे (चलित चित्र )मोशन पिक्चर इंडस्ट्रीतील सहभागी कलाकारांचा त्यांच्या उत्कृष्ट्य कार्याचा सन्मान करणे हा होता.
  • पहिल्या ऑस्कर पुरस्कारामध्ये 12 श्रेणी होत्या, ज्यामध्ये 2 विशेष पुरस्कार होते.
  • 1927-28 मध्ये हॉलिवूडमध्ये विशेष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • या अवॉर्ड फंक्शनच्या विजेत्यांची नावे समारंभाच्या ३ महिने आधी सर्वांना जाहीर करण्यात आली होती.
  • मुख्य कार्यक्रमात विजेत्यांना चषक देण्यात आले, हा केवळ 15 मिनिटांचा सोहळा होता.
  • ऑस्कर अकादमी पुरस्काराचे पहिले अध्यक्ष ‘डग्लस फेअरबँक्स’ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *