Headlines

कामगारांच्या कष्टाला सन्मान द्या -प्रा. संजय खडसे Give an Honor to the Struggles of Workers: Pr. Sanjay Khadse

अकोला प्रतिनिधी:- सामाजिक अभिसरण्याच्या प्रक्रियेस समाज डॉ., वकिल, शिक्षक, अधिकारी यांच्याकडे सन्मानाच्या आणि आदराच्या भवनेने पाहतो त्याच प्रमाणे असंघटीत कामगार आपले कौशल्य पणाला लावून अल्प मजुरीत जग सुंदर बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कष्टाला आणि कलेला समाजाने सन्मान द्यावे, असे प्रखंड मत जागतीक कामगार दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मजदुर काँग्रेस आयोजित

स्वराज्य भवन अकोला येथे राष्ट्रीय मजदुर काँग्रेस आयोजित कामगार मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. संजय खडसे सरांनी कामगारी व्यसनापासून दुर राहावे. आपल्या मुलांना चांगल्या दर्जेचे शिक्षण देवून सुज्ञ नागरिक घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे उदघाटक प्रदिप वखारीया यांनी १ मे जागतीक कामगार दिन सर्व कामगारीन सन म्हणून आपल्या गावा गावामध्ये व शहरामध्ये साजरा करावा व महिला पुरूष कामगाराने संघटीत होवून राहावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी हे होते.

उपस्थित

प्रमुख उपस्थितीत मनिषा कांबळे यांनी कामगार चळवळीचा इतिहास सांगीतला. महिला पुरूष समान आहेत त्यांना समान मजुरी देण्यात यावी, महिलावर अत्याचार थांबविण्यात यावे, असे प्रतिपादन केले. प्रशांत भटकर यांनी सुतार, लोहार, गवंडी, स्टॉईल फिटींग, ईलेक्ट्रीशन सर्व कामगार मिळवून इमारत सजवतात त्याचप्रमाणे संघटीतपणे आपल्या हक्कासाठी लढा देण्याची विनंती केली. कामगार नेते शैलेश सुर्यवंशी सातत्याने व असंघटीत कामगाराच्या व र्शमीक मोलकरींच्या हक्कासाठी अहो रात्र प्रयत्नात असतात. आपल्या कल्पकतेने प्रतिकुल परिस्थितीत मुलाना उच्चशिक्षीत करणार्‍या मजुराचा सत्कार करीत असतात. त्याबद्दल प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

सदर कामगार मेळावा यशस्वी करण्यासाठी मारोती असलमोर, अमोल तायडे, दिनकर निकम, संदिप नरवने, बन्सीलाल तायडे, जाकीर शाह, गोविंद खोब्रागडे, जहिर खान, पंढरी भगत, अनिल वाघमारे, मनोज बाविसकर, सतिष वाघ, गणेश नृपनारायण, चेतन तिरकुडे, सुरेश मेंढे, गुलाब बलाळ, सतिष नागदेवे, मोहम्मद जमीर, रमेश लो, सुनिता गागा, अंभोरे, रंजना हिरणखेडे, माला नरवणे, लताबाई इंगळे, अंजु गवरे, पवित्रा सोळंके, ज्योती प्रधान, ज्योती सांग, शालू शेंडे, वनमाला नउघरे, आशा लबळे, ज्योती गुडधे, रेखा माळोदे, मुन्नीबाई ठाकुर, सुनिता नृपनारायण इत्यादी महिला पुरूषांनी मोलाचे योगदान केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. शेषराव गवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मारोती असलमोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *