विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या भारतातील तरुण मागील २ वर्षापासुन सरकारनेच त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या अधिछात्रवृत्ती साठी आज उपोषनाला हत्यार करून लढत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती BANRF -२०२१ एम. फील व पीएच. डी साठी सामाजिक न्याय विभागामार्फत आधीछात्रवृत्ती देण्यात येते . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात येऊन पोहचले पण अद्याप त्यांना आधीछात्रवृत्ती मिळाली नाही
प्रशाशनाने २ तोंडी सापाची भूमिका घेऊन फक्त अश्वसनें देऊन विध्यार्थाना व त्यांचा वेळ निघून जाईल का म्हणून नवीन मनसुबे बनवत आहे.
संशोधन विध्यार्थी कृती समिती पुणे – २०२१ मार्फत आंदोलनाचा तपशील
१. पहिले आंदोलन 1/10/2022 ला बार्टी ऑफिस समोर पुण्याला करण्यात आले
२. दुसरे आंदोलन 7 डिसेम्बर ते 9 डिसेम्बर 2022 करण्यात आले
३. तिसरे आंदोलन 30 जानेवारी 2023 करण्यात आले
४. 20 फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे चौथे बेमुदत आंदोलन सुरु केले
मागील तीन आंदोलनामध्ये प्रशासनाने तुम्हाला सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करतो अशी आश्वासने व पत्रे दिलीत. पण त्यावर कोणती पण कार्यवाही करण्यात आली नाही. विध्यार्थाने सांगितले कि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण शासनाने आमचा विश्वास घात केला.
विध्यार्थी हे ग्रामीण भागातले तसेच शहरी भागातले आहे fellowship अधिछात्रवृत्ती नसल्या कारणाने २ वर्ष पासून त्यांचं शोध अभ्यास मध्ये अडथळे निर्माण होत आहे . काहींचे रूम भाडे थकले आहे कुणाचे मेस चे बिल थकीत आहे. सरकारने त्यांच्या मागण्या त्वरित अमलात आन्यावात असे विद्यार्थ्यांची मागणी आहे.
सरकारने यांच्या सोबत पण राजकारण न करता दिलेला शब्द त्वरित पूर्ण करावा आणि उद्याची घडणारी पीडी हि उच्च शिक्षित करून राष्ट्र निर्मितीला योगदान द्यावे.
आंदोलनाची अधिक माहिती
दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातून महासंचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन
व प्रशिक्षण संस्थांचे महासंचालक यांना एक पत्र दिले होते. त्या पात्रात ९१७ विध्यार्थी पात्र झाले आहेत असं मान्य करून
शासनास अहवाल देण्यात यावं असे पत्र दिले.
या पत्राचे उत्तर म्हणून :
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थां (बार्टी ) यांनी मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांना पत्रा द्वारे कळविण्यात आले कि ८६१ पात्र विध्यार्थाना अधिछात्रवृत्ती देण्याबाबतचे आदेश लवकरात लवकर करावे अशी विनंती करण्यात आले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थां (बार्टी ) पुणे यांचे जा. क्र /बार्टी पुणे /अधिछात्रवृत्ती /२०२२-२३/५७५ या पत्राद्वारे संशोधन विध्यार्थी कृती समितीला पत्राद्वारे ८६१ विद्यार्थ्यांची यादी शासनास पडवण्यात आली आहे. तसेच शासन मान्यतेने तात्काळ अधिछात्रवृत्ती वितरणाची सुरुवात करतात आहोत असे या विध्यार्थ्यांना सांगण्यात आले.
पण या विद्यार्थ्याचे दुदैव असे कि मंजुरी भेटून पण अजून पर्यंत अंमलबजावणी ची सुरुवात झाली नाही. हीच शासन व्यवस्था सारथी आणि महाज्योती च्या संशोधक विध्यार्थाना सरसगट अधिछात्रवृत्ती देते मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थां BANRF २०२१ विद्याथ्यांसोबात असं कुटील दुजाभाव करते असे इथे दिसत आहे हे शासनाने खोटे ठरवावे. हा भेदभाव न करता त्यांना सुद्धा समानतेने वागणूक देऊन आधिछात्रवृत्ती तात्काळ वितरन करावी.
खुप छान आपले खुप खुप धन्यवाद…