मानोरा तालुक्यातील वाशीम जिल्हा महाराष्ट्र इथे हे गाव आहे याच ठिकाणाला बंजारा समाज बांधवांची काशी म्हटल्या जाते . कारण पण तसेच आहे पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे.
जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संपूर्ण भारतामध्ये या समाजाचे जवळपास 12 कोटी जनतासंत सेवालाल महाराज यांना मानते.
जा ठिकाणच्या सुशोभीकरण कारण आणि या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकार कडून निधी उपलब्ध करून दिला आहे तो कश्या स्वरूपाचा आहे आणि करीती निधी मजूर केला त्याचे सरकारी GR तपशील आपण इथे पाहणार आहे.
शाषण निर्णय
श्री संत सेवालाल महाराज , पोहरादेवी, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.तीर्थवी २०१७/प्र.क्र. ७८/योजना-६,दि. २२/११/२०१७ अन्वये रु. २५.०० कोटी निधी मंजूर केला होता. यानंतर ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. तीर्थवी-२०१९/प्र.क्र. ४१/योजना-६,दि. ८ मार्च, २०१९ नुसार रु. ७५.०० कोटी एवढा अतिरिक्त निधी मंजूर केला होता. अशाप्रकारे एकूण रक्कम रू. 100.00 कोटी इतक्या रक्कमेच्या विकास आराखडयास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यापैंकी रु.18.50 कोटी इतका निधी वाशिम यांना वितरीत करण्यात आला आहे.
योजनेचे नांव
श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी, जि. वाशिम
केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
राज्य पुरस्कृत
योजना कधी सुरु झाली
शासन निर्णय क्र. तीर्थवी-२०१९/प्र.क्र. ४१/योजना-६,दि. ८ मार्च, २०१९ अन्वये योजना सुरू करण्यात आली आहे. View
योजनेची थोडक्यात माहिती
श्री संत सेवालाल महाराज , पोहरादेवी, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.तीर्थवी २०१७/प्र.क्र. ७८/योजना-६,दि. २२/११/२०१७ अन्वये रु. २५.०० कोटी निधी मंजूर केला होता. यानंतर ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. तीर्थवी-२०१९/प्र.क्र. ४१/योजना-६,दि. ८ मार्च, २०१९ नुसार रु. ७५.०० कोटी एवढा अतिरिक्त निधी मंजूर केला होता. अशाप्रकारे एकूण रक्कम रू. 100.00 कोटी इतक्या रक्कमेच्या विकास आराखडयास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यापैंकी रु.18.50 कोटी इतका निधी वाशिम यांना वितरीत करण्यात आला आहे.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
लेखाशीर्ष 2515 2584.
तरतूद (सन 2021-22) :- रु. 25.00 कोटी.
योजनेच्या लाभाचे स्वरुप
गांव/ ग्रामपंचायत