Headlines

H3N2 विषाणूचा धुमाकूळ सर्दी, खोकल्याचे अंग दुखी, उलटी ,संडास रुग्ण घराघरांत : H3N2 virus cold, sore throat, vomiting, wheezing

H3N2 virus smoky cold, sore throat, vomiting, sore throat, wheezing

सध्या देशात दिवसेंदिवस H3N2 विषाणूच संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तुरळक रुग्ण दगावले सुद्धा आहे जरी मरण्याची संख्या कमी असली तरी हा खूप जोरात पसरत आहे आणि वेळीच याची दखल घेण्यात न आल्यास रुग्ण दगावू शकतो.

काय आहे हे जाणुन घ्या :

व्हायरल इन्फ्लूएंझा (Influenza) म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. दरम्यान आता H3N2 विषाणूची शहरात व गावात   देखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आता वातावरणातील बदलामुळे घराघरांत ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. H3N2  या व्हायरसचे हे रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने राज्यांना सतर्क केले आहे.

कोणत्या वय गटातील लोकांना होऊ शकते :

मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या व्हायरसचे शिकार बनल आहेत. 

आरोग्य विभागाने जनतेला हे करण्यास आव्हान केले आहे ! 

आपल्याला H3N2 व व्हायरस पासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी करण्याची माहिती दिली आहे.

  • रुग्णांनी मास्क वापरावा
  • वेळोवेळी हात धुवावेत
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
  • साधा आहार घ्यावा
  • पाच दिवस आराम करावा
  • घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा

सर्व दक्षता जशी तुम्ही कोरोना च्या काळात घेतली तशीच काळजी आता सुद्धा घ्यायची आहे

H3N2 विषाणूचे लक्षणे

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) म्हणजेच यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, H3N2 हा एक गैरमानवी म्हणजे माणसातून नाहीतर इतर जनावरातून इन्फ्लूएंझा विषाणू आहे.

हा विषाणू सामान्यतः डुकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो.

लक्षणे :

१. हंगामी फ्लूसारखीच असतात.

२. ताप

३. आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात.

४. खोकला किंवा नाक वाहणे

५. तसेच अंगदुखी,

६. मळमळ, उलट्या किंवा अतिसार

यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.


इतर आरोग्य बातम्या नक्की वाचा :


IMA ने केलेल्या सूचना

१. IMA नेअँटिबायोटिक्स गैरवापराविरुद्ध सावधगिरीची माहिती प्रसारमाध्यमांमध्येजारी केली आहे..

२. असे दिसत आहे की बरेच लोक स्वतःहून अँटीबायोटिक्स घेत आहेत त्यामुळे त्यांना इतर त्रासाला सामोरे जावे लागत आहे आपल्या डॉक्टर च्या सल्ल्यानेच अँटिबायोटिक्स घ्यावे ते दिलेल्या कालावधी साठीच घ्यावे.

३. Oseltamivir हे WHO ने शिफारस केलेले औषध आहे. आणि ते सरकारी दवाखाण्यात उपलब्ध करून दिली आहे..

हा विषाणू खूप जोरात पसरत आहे आता गावो गावी आणि शहरात सुद्धा अस्या रुग्नाची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला जपणे खुप गरजेचे आहे.

आरोग्य विषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आयकॉन वर क्लिक करून जॉईन करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *