Headlines

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र ! Beneficial vs. Toxic Friendships: Understanding the Difference

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र

आज जगात सदाचरणाची अत्यंत गरज आहे.सदाचरणा शिवाय जगाचे नियम होणे शक्य नाही.म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माद्वारे सदाचरणी माणसे घडविण्याचे कार्य केलेले आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, सदाचार म्हणजे परिवर्तन, परिवर्तन म्हणजे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे होय. म्हणुन तथागत म्हणतात “असे वानाच्च बालाण, पंडितांनच्च सेवना.पुजाच पुजनियान एत् मंगलम मुत्तम्म ! अर्थ:- मुर्ख दुर्व्यसनी आणि घातकी माणसाची मित्रता न करणे उत्तम मंगल होय. तर मग आपण संगत कुणाशी करायला पाहिजे दुर्व्यसनी ,दुराचारी,घातकी,आणि लोभी माणसाशी का,नाही.तर संगत असली पाहिजे ती शीलवान,गुणवान,प्रज्ञावान,चरित्रवान,सदाचारी माणसाशी तरमग असा सदाचारी माणूस ओळखायचा तो कसा.

विरुद्ध दिशेने जाणारा सुगंध कोणता ?

तथागत म्हणतात, ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध कधी हवेच्या विरुध्द दिशेने वाहत नाही.परंतु शीलवान सत्पुरुषाचा सुगंध मात्र हवेच्या विरुध्द दिशेने सुध्दा वाहू लागतो.आणि अशाच शिलवानाला सत्पुरुष म्हणतात.असे सत्पुरुष जातील त्या परिसराला सुगंधाने प्रभावित करीत असतात.आणि म्हणुनच तथागत म्हणतात.संपुर्ण सुगंधी फुलाच्या सुगंधापेक्षा शीलाचा सुगंध मात्र अधिक अलौकिक असतो.आणि म्हणुनच संगत करण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे.कारण, सत्याचा साक्षात्कार घडवुन आणण्याचे किंवा पुर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ ह्याच संगतीत आहे.म्हणुन संगत ही विचार पूर्वक केली पाहिजे.अशाच पुरुषाशी आपली सदैव मैत्री असली पाहिजे.तरमग असा योग्य मित्र निवडायचा नी ओळखायचा कसा,योग्य मित्र कुणाला म्हणतात.योग्यमित्र म्हणजे,ज्या मित्रामध्ये समता आहे.ममता आहे.ज्या मित्रामध्ये मैत्री आहे.शिस्त आहे.विनय आहे.ज्या मित्रामध्ये नम्रता आहे.सदाचार आहे.ज्या मित्रामध्ये दया आहे.करुणा आहे.ज्या मित्रामध्ये आज्ञाधारपणा आहे.सहन शीलता आहे.आणि ज्या मित्राचे मृदु संभाषण आहे.अशा मित्रालाच योग्य मित्र समजावा. अशा मित्रालाच कल्याण मित्र समजावा.

”तुझ्यासाठी हा देह कृतार्थ व्हावा,तुझ्यापाशी मजला मिळावा विसावा.

सुखाचा प्रभोतव निवारा मिळावा, अहंकार पाई तुझ्याही नसावा !

तथागत म्हणतात, शब्दांनीच पेटतात घरे,दारे आणि माणसे सुध्दा, शब्दानेच संघर्ष वाढतो, शब्दानेच संघर्ष मिटतो, शब्दानेच मित्राचे रूपांतर शत्रुत होते.तर शत्रूचे रूपांतर मित्रात होते.म्हणुन वाणी ही मधुर असली पाहिजे,संभाषण मृदु असले पाहिजे.    उच्चारा वरून विद्ववत्ता, आवाजा वरून नम्रता आणि वर्तनावरून शिल समजते.म्हणुन आचार विचार आणि वाणी मधुर असली पाहिजे.जर मित्र दुराचारी असेल, स्वैराचारी असेल,अंधश्रध्दे मध्ये नेऊन ढकलणारा असेल.तर मात्र अशा दुराचारी माणसाची संगत कदापि करू नये. ”पित्त वस्त्र धरण करी मलीन असे जो अंतरी, त्यास वंदनीय पुरुष म्हणू नये. पित्त वस्त्राचा धनी जो असे शीलवान,पटीका समान शुध्द असे, आकाशा समान शुध्द असे.

सुख दुःख सर्वांनाच

मानवी जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वावरच येत असतात.मग तो पंत असो,महंत असो,संत असो,वा भगवंत असो.यापैकी ९०%घटना मानवाच्याच स्वाधीन असतात.तर केवळ १०%घटना पराधीन असतात.परंतु सामान्य लोकांचा असा गैरसमज आहे की,मानवी जीवनात सर्वच घटना पराधीन असतात.म्हणुन दैव वादाचा त्याग करून प्रयत्न वादाची कस धरण्यातच खरे शहाणपण आहे.देवासगट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ याच प्रयत्नात आहे.म्हणुन प्रयत्न हे रत्न देवा पेक्षाही श्रेष्ठ रत्न आहे.  कल्याण मित्र सुध्दा ऐऱ्या गैऱ्यांना सापडत नसतात.त्यासाठी पहिल्यांदा आपण स्वतःला कल्याण मित्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कबीरदास म्हणतात.”बडा बढाई ना कर बडा ना बोले बोल, हिरा मुखसे कभिन कहे,लाख रुपया मोल”मी कल्याण मित्र म्हणुन कोणताही योग्य मित्र आपणास सांगणार नाही.तो स्वतालाच ओळखावा लागेल.योग्य कोण नी अयोग्य कोण.

मित्र सुध्दा दोन प्रकारचे असतात.

१) कल्याणकारी मित्र २) अकल्यांणकारी मित्र ,पैकी कल्याणकारी व अकल्याणकारी.

अकल्याणकारी मित्र सुध्दा चार प्रकारचे असतात.

प्रथम कल्याणकारी मित्र पाहु

१) साह्य करणारा मित्र

२) सुख दुःखा मध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र

३) सत्य वर्तनाचा सल्ला देणारा मित्र

४) सहानुभुती दाखविणारा मित्र

१) साह्य करणारा मित्र

तुम्ही बेसावध असला तर हा मित्र तुम्हाला सावध करतो.निरपेक्षपणे तो तुम्हाला सदैव योग्यच सल्ला देतो.समदृष्टी ज्ञान की परख है , निष्कामता सदगुणकी परख है,ब्रम्हचर्या नीती की परख है,नम्रता भक्ती (लीनता) की परख है,निस्वार्थता सहाय्य मित्र की परख है,

२) सुख दुःखा मध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र

ज्या प्रमाणे भुके शिवाय भोजन पचत नाही त्याच प्रमाणे दुःखा शिवाय सुख सुध्दा पचत नाही.याच प्रमाणे हा मित्र आपल्या सुख दुःखा मध्ये समान मैत्री ठेवीत असतो.आपल्यातील गुपित तो गुप्त ठेवतो                                                                                                      

३) सत्य वर्तनाचा सल्ला देणारा मित्र

ह्या मित्राचे तीन लक्षणे असतात. १ तो गुणी असल्याने त्याला चिंता मुळीच शिवत नाही.२ तो शहाणा असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो. ३आणि तो शूर असल्याने त्याला भीती कधीही ग्रासत नाही.म्हणुन हा मित्र आपल्याला सतत आपण वेळी अवेळी काय केले पाहिजे त्या संबधी सल्ला देतो.वाईट गोष्टी पासुन आपणाला परावृत्त करतो.चांगले कर्म करायला प्रवृत्त करतो.

                                                                                                                                                           

४) सहानुभुती दाखविणारा मित्र

मैत्री ही झाडाच्या आळ्या सारखी असते.पण त्याला प्रेमाचा ओलावा नसेल तर त्या मैत्रीचा काय उपयोग असे तो आपणाला सातत्याने पटवुन देतो.आपल्या दुःखाने दुःखी व सुखाने सुखी होतो.तुमची निंदा करणाऱ्यांची तो तोंड बंद करतो , अशानांच कल्याण मित्र म्हणतात.

आता आपण पाहु अकल्याणकारी मित्र हे सुध्दा चार प्रकारचे असतात

friendship कल्याणकारी कल्याणकारी

१)लोभी मित्र

२)बोल घेवडा मित्र

३)खुशामत करणारा मित्र

४)उधड्या मित्र

१) लोभी मित्र

लोभी माणुस आपला नी सर्वाचाच शत्रु असतो.हा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो.पण आतून मात्र आपला पक्का शत्रु असतो.तो आवळा देऊन भोपळा काढत असतो.तो अंतरबाह्य स्वार्थी असतो.परंतु अभिनय मात्र सदैव मित्राचाच करीत असतो.अशा मित्रा पासुन आपण सावध असावे.

२) बोल घेवडा मित्र

हा मनुष्य फार बोलत असतो.फार बोलतो म्हणुन काही तो पंडित ठरत नाही.तथागत म्हणतात, मन मोकळे असावे परंतु जीभ मात्र मोकळी असू नये कारण जीभ तोंडात असते.पण कधी कधी डोक फिरवायचे काम ही जीभच करीत असते.म्हणुन हा बोलघेवडा मनुष्य सारखा बडबड करून अशाच पोकळ शब्दांनी आपल्याला खुश करून स्वार्थ साधण्याची याची धडपड असते.आणि ऐनवेळी तो आपल्याला दगा देत असतो.अशा गोडबोल्या व्यक्ती पासुन आपण सावध असावे.

३) खुशामत करणारा मित्र:-

असा मित्रही शत्रूच असतो.तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा करणे हा त्याचा स्वभाव असतो.वाईट कामे आपल्या हातून व्हावीत व आपण अडचणीत यावे.असे या दांभिकाला सतत वाटत असते.म्हणुन अशाही व्यक्ती पासुन आपण सावध असावे.

४) उधड्या मित्र

वाईट गोष्टीला प्रोसाहन देणे आणि स्वताची तुंबळी भरून घेणे असे त्याचे कार्य असते.संत कबीरदास म्हणतात.”एरण की करे चोरी,सुई का करे दान ! और देखत है रह कब आयेगा विमान ! म्हणुन असल्या चार अकल्याणकारी मित्राची संगत आपण टाळावी आणि कल्याण मित्राची संगत धरून स्वतःही दुसऱ्यासाठी कल्याण मित्र बनण्याचा प्रयत्न करावा ! आणि वस्तुस्थितीचा विचार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच आहे खरी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली माणसाने माणसा बरोबर माणसा सारखे वागून परस्परांना सुखी व आनंदी करण्याचा प्रयत्न करणे हेच आहे देवाचे पुजन हीच आहे.

कल्याण मित्र

भक्ती,व उपासना आणि तोच आहे खरा मानव धर्म म्हणुन कल्याण मित्र बनन्याकरीता सर्वप्रथम रागाला,व्देषाला,लोभाला आणि तृष्णेला जिंकावे लागेल यांना बाजूला सारावे लागेल.तथागत म्हणतात,”नत्थी राग समो अग्गी,नत्थी दोष समो गहो, नत्थी मोह सम जाल,नत्थी तन्हा समा नदी ! म्हणजे राग सारखा अग्नी नाही, दोषा सारखे दुसरे वाईट घर नाही, मोह सारखे दुसरे घर नाही, आणि तृष्णे सारखी दुसरी नदी नाही,दुसरा प्रवाह नाही.

व्देषाला प्रेमाने जिंकावे

म्हणुन जो पर्यंत आपण रागाला, व्देषाला, लोभाला, आणि तृष्णेला मुठमाती देणार नाही.तो पर्यंत आपल्याला कल्याण मित्राचा स्वाद मिळणार नाही.व्देषाला-व्देष भेटल्याने नव्हे तर प्रेम भेटल्याने व्देष शमतो.हा त्याचा स्वभाव आहे.आपल्याला जर सुखमय जीवन जगण्याची अभिलाषा असेल तर आपल्या शत्रुचा सुध्दा आपण व्देष करू नये.कारण व्देष हा शरीराला खातो.ह्रुदयाला थकवा आणतो.विचार शक्तीला बधीर करतो.आणि ममता,स्नेह माणुसकीला तिलांजली देत असतो.

म्हणुन व्देषाला प्रेमाने जिंकावे, औदर्याने लोभ तर सत्याने असत्याला जिंकावे.म्हणुन तुकडोजी महाराज ग्रामगीते मधून म्हणतात, “हाती न घेता तलवार,बुध्द राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली”! म्हणुन माणसाने प्रज्ञा,शिल,करुणा अंगी बाळगली पाहिजे.कायिक,वाचिक व मानसिक प्रज्ञा हे विचार धम्म होय, शिल हे आचार धम्म होय, करुणा हे मैत्री धम्म होय.

(१) कायिक म्हणजे देह शुचिता:- हिंसा,चोरी,आणि मिथ्याचार न करणे ही कायिक शुचिता होय.

(२) वाचिक म्हणजे वाक् शुचिता:- खोटे न बोलणे चुगली न करणे फाजील बडबड न करणे यालाच वाक् शुचिता म्हणतात.

(३) मानसिक शुचिता:- म्हणजे आळस,उद्धटपणा,लोभ,गोंधळ,इर्ष्या यावर ताबा मिळविणे हे मानसिक शुचिता होय. काया, वाचा, मन जेव्हा निष्कलंक राहील तेव्हाच आपण दुसऱ्यासाठी खऱ्या अर्थाने कल्याण मित्र बनु शकतो.

आपणही सदनशिल मार्गाचा अवलंब करावा.कायिक, वाचिक, व मानसिक विजय मिळवुन कल्याण मित्र बनावे सर्वांना वाटते. अकल्याणकारी मित्र बनावे कुणालाच वाटत नाही.तरीही अकल्याणकारी मित्राची संख्या पुष्कळ आहे.कारण “व्यसन” म्हणुन सर्व प्रथम आपण व्यसनाला बाजूला सारावे कारण व्यसनी मनुष्य धैर्य, शौर्य, शिल, सदाचार, देशप्रेम, धर्मनीती, सामाजिक नीतीमत्ता, कौटुंबिक जबाबदारी या सर्व तत्वांना मुठ माती देत असतो.

ज्ञानरूपी अग्नीने अज्ञानालाच जाळुन भस्म करा

क्षणभर स्वताच्या ऐहिक सुखाची अपेक्षा करणारा व्यसनी मनुष्य आपल् जीवन बरबाद करायला स्वतंत्र आहे.परंतु हे विचार उत्पन्न होतात ते फक्त अज्ञानातून म्हणुन आपण ज्ञानरूपी अग्नीने अज्ञानालाच जाळुन भस्म केल पाहिजे,व ज्ञानाच्या प्रकाशाने आपल् आयुष्य प्रकाशमान केल पाहिजे.तथागत म्हणतात, बुद्धिमान व्हा आणि सत्संगती धरा, मुर्ख मनुष्याला आयुष्यभर जरी सत्संगती लाभली तरी ज्या प्रमाणे चमच्याला डाळीची चव कळत नाही.त्या प्रमाणे मुर्खाला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. परंतु बुद्धिमान माणसाला जर एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला.तरी ज्या प्रमाणे जिभेला डाळीची चव एका क्षणात कळते त्या प्रमाणे शहाण्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कडुन आल्या शिवाय राहात नाही.म्हणुन म्हणतात, मूर्खाची संगत असे दुखदायक, सदगुनाची संगत असे सुख दायक !

व्ही.के.राऊत

विचारवृत्त संपादक

One thought on “कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र ! Beneficial vs. Toxic Friendships: Understanding the Difference

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *