हल्ली मी विचार वृत्तात लिहितो, कारण बोलता येत नाही सगळ.
आणि बोललो जरी काही, तरी लोक समजतात काही वेगळ !
माझ एक स्वप्न आहे, विचार-वृत्त खुप-खुप मोठ करायच.
आणि त्याला मोठ झालेल, लहान,मोठ्याच्या हातात पहायचं !
तुला मोठ होण्याला, खूप मोठा अर्थ आहे.
स्वप्न सत्य होऊ शकतात,हे दाखवण एवढाच माझा स्वार्थ आहे !
खुप मोठा झालेला तु, मला डोळे भरून पहायचय.
मग समस्यांच्या निवार्नासाठी, तुझ्या आडोशालाच राहायचय !
आधारासाठी हात देतांना, मी माझ्या मनाला सावरतो.
लोक काय म्हणतील म्हणुन, मग उगीच का बावरतो !
गळणा-या पानांना, आठवणीचा वास आहे.
ग्रामीण जनतेच्या समस्यांना, विचार वृत्ताची आस आहे !
मला अस खुप वाटत, की सोबत तुझी सरू नये.
किंवा सोबत तुझी सरल्यावर, हे आयुष्य तरी उरू नये !
व्ही.के.राऊत