शिवसेनेची नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती . सर्वोच्च न्यायालयाने हि मागणी आज दिनांक २२ फेब्रुवारी ला फेटाळून लावत आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शिवसेनेला ठाकरे -(यूबीटी) आणि मशाल हे त्यांच्याकडे राहणार आहे
शिवसेनेचे (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने युक्तिवाद करताना, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीएम एकनाथ शिंदे कॅम्पने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वाटप केल्यानंतर “कार्यालय” घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. “जोपर्यंत तुमचा अधिपती निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्हाला यथास्थितीचा आदेश हवा आहे,” असे सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितले. हि विनंती फेटाळण्यात आली.
शिवसेना UBT म्हणजे काय ?
शिवसेना-(UBT)उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात आले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (बाळासाहेबांची शिवसेना) असे नाव देण्यात आले आहे.