Headlines

माणसांना शिस्त लावण्यास तयार होत आहे जैविक संगणक. – अविनाश राऊत biocomputer Organoid intelligence, what is Bio-computers, Brain Culture

काय आहे बायोकॉम्पुटर ? Bio-Computer

 जैविक संगणक हे असा कम्प्युटर जो मानवी मेंदूप्रमाणे काम करेल आणि तुमचे स्वप्नसुद्धा साकार करेल तर जाणून घेऊया आणि हे आता Organoid intelligence ओर्गनॉइड  इंटेलिजन्स च्या माध्यमातून हे कसे शक्य होणार आहे.

तो संगणक व मशीन आणि माणसाच्या पेशी मिश्रणेने बनलेला असेल  माणसासारखा  म्हणजे तांत्रिक माणूस. 

आता हे नवीन ऑरगॅनॉइड इण्टेलिजन्स  Organoid intelligence काय आहे आता कुठे आपण आर्टीफिसिअल इंटेलिजन्स शिकायला सुरुवात केली होती. 

तसं तर थोडंफार आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहीतच आहे पण हे ऑर्गनाईड इंटेलिजन्स काय आहे ?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे नाही मग याच्यामध्ये फरक काय आहे. आपण आता यांचा फरक जाणून घेऊया.

AI आणि OI मध्ये काय फरक आहे :

तर आता आपण पाहूया या दोघांमध्ये काय फरक आहे ते. हे कसे AI आणि OI वेगवेगळे आहेत हे आता आपण पाहूया.

ए आय(AI ) Artificial Intelligence :

हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी किंवा ए आय संबंधित सॉफ्टवेअर बनविण्यासाठी डेव्हलपर होण्याचे म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असायला पाहिजे.

जसे की तुम्ही बीएससी ,बीसीए, बीसीएम, बीई यासारखे अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही सी, सी प्लस प्लस, जावा ,पायथन, यासारख्या लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहू शकले पाहिजे.

कारण कम्प्युटर हे यासारख्या मधातल्या लँग्वेज समजू शकते तुमची म्हणजे मराठी भाषा समजू शकत नाही आणि यामध्ये प्रोग्राम लिहिण्यासाठी माणसाची भाषा किंवा माणसाची कृती कम्प्युटरला डायरेक्ट समजत नाही त्यामुळे कम्प्युटरला समजणारी भाषा त्यामध्ये कौशल्य घेवून आपण कम्प्युटर साठी त्याला समजणाऱ्या भाषेतच संवाद साधू शकतो.

पण आता OI ऑरगॅनॉइड इण्टेलिजन्स Organoid intelligence:

च्या माध्यमातून तुम्ही या इतर कंप्यूटर लैंग्वेज चा वापर न करता डायरेक्ट कम्प्युटर सोबत जुळू शकाल म्हणजेच बायो कम्प्युटर म्हणजे अर्धा माणूस अर्धा टेक्नॉलॉजी अशा पद्धतीची नवीन बायो कम्प्युटर्स तयार होऊ शकतील.

यामुळे कम्प्युटर हे डायरेक्ट माणसासोबत कनेक्ट म्हणजे मासाच्या ब्रेन मधल्या नर्व्ह सोबत कनेक्ट असल्याकारणाने माणसासारखेच शिकू शकतील जसे की नवीन विषयाचे नॉलेज घेणे अभ्यास करणे नवीन गोष्टी आकलन करणे तार्किक दृष्ट्या विचार करणे ,भावनिक दृष्ट्या विचार करणे , यासारख्या गोष्टी कम्प्युटर आता करू लागेल. म्हणजे cognitive process मध्ये तो शिकू शकेल. 

यामुळे माणसांचे काम खूपच हलके होणार आहे तो स्वतः माणसासारखे काम करेल. आणि आजूबाजूच्या वातावरणासोबत तालमेल जोडून तो बोलेल सुद्धा आणि काम सुद्धा करेल.

यालाच आपण जैविक संगणक असे म्हणू शकतो हे सिलिकॉन आधारित जैविक संगणकाचे आणि म्हणून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स  पेक्षा अधिक कार्यक्षम असेल.

‘ऑर्गनॉइड इंटेलिजन्स’ (OI) काय असेल what is Organoid intelligence?

मानवी मेंदूच्या पेशी (मेंदू ऑर्गनॉइड्स) आणि मेंदू-मशीन इंटरफेस तंत्रज्ञानाच्या 3D वापर करून जैविक संगणन विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या उदयोन्मुख बहु-विषय(Dimensions ) क्षेत्राचे वर्णन करते.

OI साठी सध्याच्या मेंदूच्या ऑर्गनॉइड्सना जटिल, टिकाऊ 3D स्ट्रक्चर्समध्ये वाढवणे आवश्यक आहे जे पेशी आणि जनुकांनी शिकण्याशी संबंधित आहेत आणि त्यांना पुढील पिढीच्या इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आणि AI/मशीन लर्निंग सिस्टमशी जोडणे आवश्यक आहे.



इतर कोणत्या समस्या या जैविक संगणकाची सोडवला जाऊ शकतील:

१. OI संशोधन मेंदूचा विकास, शिकणे आणि स्मरणशक्ती याविषयीची सुधारणा करू  शकते,

२. ज्यामुळे स्मृतिभ्रंश सारख्या न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार शोधण्यात मदत होते.

३. हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या म्हणजेच नवीन भाषेत एम्बइडेड नैतिकता हा प्रकार समोर येईन.

४. यालाच आपण धर्म व अधर्म मधील फरक समजण्यास तो सहकार्य करेल.

५. नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिसादात्मक पद्धतीने OI विकसित होईल याची खात्री करण्यासाठी ‘एम्बेडेड नैतिकता’ दृष्टीकोन आवश्यक आहे जेथे नीतिशास्त्रज्ञ, संशोधक आणि लोकांच्या सदस्यांच्या आंतरशाखीय आणि प्रतिनिधी कार्यसंघ नैतिक समस्या ओळखतील , चर्चा करतात आणि त्यांचे विश्लेषण करतील  आणि भविष्यातील संशोधन आणि कार्याची माहिती देण्यासाठी त्यांना तयार  करतात. .

६.म्हणजेच एक प्रॉपर आणि चांगला पद्धतीचा तो एक न्यायाधीश असू शकेल आणि तो न्याय निवाडा सुद्धा कोणत्याही गोष्टीचा लिंगभेद धर्मभेद व जातीभेद अशा पद्धतीचा भेदभाव न करता तो स्वतः न्याय शुद्ध पद्धतीने न्याय निवाडा करू शकेल.

हार्टुंग यांनी  organoid intelligence ऑर्गनॉइड इंटेलिजेंसची व्याख्या “लॅब-उगवलेल्या मानवी-मेंदूच्या मॉडेलमध्ये संज्ञानात्मक कार्ये केले आहे , जसे की शिक्षण घेणे नवीन गोष्टी शिकणे आकलन करणे आणि संवेदी प्रक्रिया यांचे पुनरुत्पादन करणे” यावर त्यांचे कार्य आहे .

संज्ञानात्मक कार्य (Cognitive work )म्हणजे शिकणे, विचार करणे, तर्क करणे, लक्षात ठेवणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि लक्ष देणे यासह अनेक मानसिक क्षमतांचा संदर्भ देते.


थॉमस हार्टुंग हे या कामाचे नेतृत्व करत आहेत ते जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि व्हाईटिंग स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधील पर्यावरणीय आरोग्य विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. 

बायोकॉम्प्युटिंग हा संगणकीय यावर कार्य करण्यास कसा सक्षम बनु शकेल त्यासाठी ते व त्याचे सहकारी परिश्रम  करताहेत . 

आणि आपल्या सध्याच्या तांत्रिक मर्यादा ओलांडण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ते प्रचंड कार्य करत आहेत.


त्याच बरोबर 2022 मध्ये, मेलबर्न-आधारित कंपनी कॉर्टिकल लॅबच्या संशोधकांनी हे दाखवून दिले की चिपवर वाढलेल्या मेंदूच्या पेशी पिंग पॉंग हा व्हिडिओ गेम खेळण्यास त्वरीत शिकू शकतात. 

संशोधक “सिंथेटिक बायोलॉजिकल इंटेलिजेंस” ज्याला संशोधक म्हणतात ते प्रथमच या अभ्यासाने दाखवून दिले, ज्याद्वारे मेंदूच्या पेशींचे नेटवर्क त्यांच्या क्रियांच्या परिणामांबद्दल मर्यादित अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून, विशिष्ट उद्दिष्टासाठी त्यांची क्रिया स्वयं-व्यवस्थित करू शकतात.

फक्त Organoid म्हणजे काय मग ?

प्रयोगशाळेत वाढवलेली  स्टेम सेल्स (पेशी ज्यातून इतर प्रकारच्या पेशी विकसित होतील ) पासून बनवलेल्या एक छोटी पेशी , 3-आयामी(३D) वस्तुमान असेल अशी. 

ऑर्गनॉइड्स जे मानवी ऊती आणि अवयवांसारखे असतात किंवा विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरसारखे असतात, ते वाढविले जाऊ शकतात. आपल्या शरीरामधील ज्या सेल असतील अगदी त्यासारखीच त्यापासुन त्याला व्ययस्थित वाढ देऊन आपण आपले तुटलेले हात पाय परत तयार करू शकु त्याला स्टेम सेल पद्दत म्हणता येईन. 

माणसाचा दिमाग म्हणजे माणसाचा मेंदू हा संगणकापेक्षा धीमा  आहे कारण संगणक खूप जास्त गतीने अवघड असे गणित व इतर काम करू शकते .

पण आपला मेंदू एकाच पद्धतीने नाहीतर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तर्काने प्रश्न हाताळू शकतो तसे मात्र संगणकाच्या बाबतीत होत नाही तो सतत एकाच पद्धतीने दिलेल्या इन्स्ट्रक्शन सिक्वेन्सी पूर्ण करतो आपण ज्या जैविक पद्धतीने शिकलो ती पद्धत अवगत नाही.

हे आता जैविक संगणक ऑरगॅनॉइड च्या माध्यमातुन फक्त वायरिंगच नाही तर यासारख्या माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल्स त्या संगणकामध्ये असतील .

Organoid ऑर्गनाइड  सारख्या जर का तयार झाली तर ते इतर सेल प्रजनन करू शकतील व बरेच सेल तयार करतील आणि ह्या सर्व त्या बायो कम्प्युटर मध्ये असेल कदाचित यामधील काही सेल्स किंवा काही भागातील सेल्स काही भाग खराब झाला असेल तर तो स्वतः दुरुस्ती करू शकेल.

सध्या वैज्ञानिकाने उंदरामध्ये हे ऑर्गनाईड सेल टाकून त्यांच्या मेंदू सोबत यशस्वीरित्या संपर्क साधलेला आहे व त्यावरती रक्त फोटो पुरवठा देऊन इतर संशोधने केल्या जात आहे. याच्या साह्याने वैज्ञानिक सुखद किंवा दुःख त्या पद्धतीचे तरंगे देण्यास यशस्वी झाले आहेत.

त्याचबरोबर त्याचा वापर हृदयाचे निरीक्षण करण्यास केल्या जाऊ शकतो म्हणजे हे ECG  पेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या हृदयाकडे लक्ष देऊ शकतात. 

या Organoid च्या समूह करून करणाऱ्या प्रयत्नाला आता आपण Organoid Intelligence  म्हणू शकतो. 

सध्या काय समस्या आहे:

या कामाचे नेतृत्व करणारे JH युनिव्हर्सिटी मधील थॉमस हार्टुंग हे आहेत हे म्हणालेत की त्याच्याकडे आता काही  गोष्टी शिकण्याची क्षमता आहे पण आता जास्त वेळ लक्षात राहील अशा गोष्टी शिकवणे थोडे अवघड जात आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार एक ते दोन वर्षांमध्ये हे तयार होईल आणि नंतर हे माणसाचे मेंदूमध्ये टाकल्या  जाऊ शकेल यामुळे अल्झायमर व बरेच मेंदू विकारांमध्ये याचे फायदा होऊ शकेल.

हे तेवढेच चांगले व तेवढेच  खतरनाक पण असू शकतील जर का ते प्रभावित होऊन वाईट काम करण्यास प्रवृत्त झाले तर माणसांना सुद्धा ते स्वतःच्या इशारावर चालवतील मोठ्या मोठ्या युद्धामध्ये ते स्वतः सामोरे जातील त्यामध्ये स्वतःला दुरुस्त करून घेण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याकारणाने त्यांना मरण्याची भीती नसेल पण ते चांगल्या कामासाठी सुद्धा तयार केले जाऊ शकतील म्हणजे उद्या चालवून कायद्याची शिस्त लावण्याचे कामही ते करू शकेल आणि तेही लाच  न घेता म्हणजे ते चांगले पोलीस अधिकारी ठरू शकतील.

तशी चांगली तशी वाईट पण कामात या तंत्रज्ञानाचा वापर केल्या जाऊ शकतो. तरी यांचा उपयोग माणसाच्या उन्नतीसाठी त्यांचे आजचे प्रश्न सोडवण्यासाठी व इथे मानवी मेंदू कसा जास्तीत जास्त कसा नैतिकतेकडे विकसित केल्या जाईन म्हणून याचा वापर करावा. 

अविनाश विद्यानंद राऊत

सॉफ्टवेअर इंजिनिअर

6 thoughts on “माणसांना शिस्त लावण्यास तयार होत आहे जैविक संगणक. – अविनाश राऊत biocomputer Organoid intelligence, what is Bio-computers, Brain Culture

  1. खूप चांगल्या भाषेमध्ये नवीन तंत्रज्ञान समजून सांगितले. आणि तुमच्या बातम्या पूर्ण स्वरूपाच्या असतात धन्यवाद !!!

    1. आम्ही आपल्या दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

  2. नवीन माहिती मिळाली .. मी विचारवृत्त चे सर्व बातम्या व लेख वाचतो व माझ्या घरच्यांना पण आवडतात.

    तुम्हाला भेटायची इच्छा आहे …

    धन्यवाद !!!

  3. माहिती खूप चालल्या प्रकारे लिहिली त्या .. आणि नवीन विषय सोप्या भाषेत समजला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *