सिम कार्ड एका विशिष्ट खात्याला विशिष्ट फोनशीजोडतो ते फोन नेटवर्क कंपनीला सांगतात की कोणते खाते कोणत्या व्यक्तीच्या फोनवर जोडले गेले आहे.
फोन नेटवर्क कंपन्या सहसा ग्राहकांना सिम कार्ड च्या माध्यमातुन ग्राहक कार्ड नेटवर्कशी कनेक्ट करू देते.
SIM चा फुल फॉर्म :
सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module)
IMSI काय आहे ?
सिम कार्डमध्ये चिप मध्ये एक आयडेंटिफायर असतो, इंटरनॅशनल मोबाईल सब्सक्राइबर आयडेंटिफायर (IMSI) जो नेटवर्कवर तुमचा फोन ओळखतो.
IMSI तुम्ही जे काही कराल ते तुमच्या मोबाइल मधून ते या IMSI आईड मुळे सर्विस देणाऱ्या कंपनी कडे जमा होते (save होते) आणि हा नंबर IMSI तुमच्या कडे असलेल्या SIM कार्ड च्या CHIP चिप वर save केलेला असतो.
सिम कार्ड चा आणखी काय उपयोग होऊ शकतो other Uses of SIM card
१. सिम कार्ड महत्वाच्या काम च्या वेळेस तुम्ही त्यामध्ये मेसेज save करण्यासाठी करू शकता
२. सोबतच तुम्ही फोने नंबर व नाव देखील टाकून ठेवू शकता ते मोबाइलला च्या बाहेर जरी काढले तरी डिलीट होणार नाही
३. या गोष्टी चा वापर एखादा गुपित संदेश पाठवण्यासाठी करू शकता आणि ते हि सिम कार्ड सर्विस बंद झाली असेल तरीही.
सिम कार्ड किती डेटा साठवू शकतो? How much data can a SIM card store?
सिम कार्ड्समध्ये साधारणतः 8KB ते 256KB पर्यंतची स्टोरेज क्षमता असते, म्हणजे जवळपास २५० संपर्क आणि काही संदेश आणि तुमचा काही इतर महत्त्वाचा डेटा साठवून ठेवत असते.
म्हणून तुमच्या वापरातले सिम कार्ड फेकुन देण्याच्या आधी त्यामध्ये तुमचा काही महत्वाचा डेटा तर नाही ना हे नक्की चेक करा.
आता आपण पाहूया तुमचा कॉल दुसऱ्या व्यक्तीला कसा कनेक्ट होतो :
1.जेव्हा तुम्ही तुमच्यामोबाईलमधील नंबर डायल करून कॉल सुरू करतो तेव्हा तो थेट BTS Base Transceiver Station हे सर्वात आणि डायरेक्ट तुमच्या मोबाइलला ला कनेक्ट होतो, तो या प्रोसेस मधला पहिला घटक आहे. नंतर (Base Transceiver Station) BTS द्वारे BSC ला विनंती पाठवते ते BTS ज्या BSC ला जोडले आहे त्याला.
BSC हे बेस स्टेशन कंट्रोलर आहे .
हे एक मोठे युनिट आहे जे सर्व BTS(टॉवर्स) नियंत्रित करते. आपण असे म्हणू शकता की अनेक BTS एकाच BSC द्वारे नियंत्रित केले जातात.
3. मग BSC कडून MSC ला विनंती केली जाते ज्याशी ते जोडलेले आहे.
MSC काय आहे :
MSC चा अर्थ मोबाईल स्विचिंग सेंटर आहे. कॉल केलेल्या ग्राहकाला कॉल स्विच करण्यासाठी ते जबाबदार आहे. MSC शी अनेक BSC जोडलेले आहेत आणि ते BSC नियंत्रित करते. (पोस्टमन च काम हे MSC करतात उदाहर हे समजण्यासाठी )
नंतर MSC ज्याने कॉल केला त्याची माहिती तपासतो उदाहरणार्थ तुमच्याकडे पुरेशे शिल्लक जमा नाही हा आवाज येथूनच तपासून येतो. सर्व तपशील तपासल्यानंतर OK असेल तर पोचपावती संदेश पाठवते की कॉलर ठीक आहे. कॉल करायचा की नाही.
४.तो संदेश ओके असल्यास ऑपरेशन चालू राहते अन्यथा MSC NOT O.K पाठवते. NOT OK जर असेल तर तो मेसेज रिव्हर्स जाईन MSC -> BSC -> BTS -> तुमचा फोन आणि कॉल बंद केल्या जाईन.
५.जर MSC कडून प्राप्त झालेला संदेश ओ.के. असेल तर नंतर तो पुन्हा MSC पोस्टमन बनुन कॉल ज्याला केला त्याला शोधण्यासाठी विनंती पाठवतो (ज्याला कॉल केला जातो तो सदस्य).
६. कॉल केलेला तुमचा मित्र आणि कॉलर समान MSC किंवा भिन्न MSC अंतर्गत येऊ शकतात. जर दोघे एकाच MSC अंतर्गत येत असतील तर HLR सहजपणे सब्ससायबर शोधतो आणि MSC ला सूचित करतो की कॉल केलेला पक्ष कोणत्या क्षेत्राचा आहे. म्हणून MSC एक स्थापित करते. दोन्ही पक्षांमधील हवाई दुवा. अशा प्रकारे कॉल जोडला जातो.
७.दोन्ही पक्ष वेगवेगळ्या MSC मध्ये राहत असेल किंवा येत असेल तर तो. ज्या MSC म्हणजे आपल्या उदारहरण तो दुसऱ्या पोस्टमन ला ते काम सोपवतो . अस्या पद्धतीने MSC ते MSC कनेक्ट करून ते त्या मित्राला शोधतात ज्याला तुम्ही कॉल लावला आणि तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करून देतात. हि प्रक्रिया काही सेकंदाच्या आत होते.
- YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल
- नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान
- भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात? Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
उदहारण घेऊन समजूया : मी कामोठे पनवेल या ठिकाणी राहतो आणि मी माझ्या मित्राला उत्तर प्रदेश ला फोने लावला तर सर्वप्रथम काय होईन.
१. आदी मी माझ्या गावाच्या जवळच्या ग्राम कामोठे च्या BTS ला कनेक्ट केल्या जाईन
२. तो एका कोणत्या BSC ला जोडला असेल तो त्याला हि माहिती पाठवेल म्हणजे कामोठे चा BTS ला पनवेल च्या BSC ला जोडला.
३. नंतर BSC तो ज्या MSC ला जोडला असेल त्याला कनेक्ट करेल समजा आपण तो MSC राज्य चा असेल असे मानु मग महाराष्ट्र MSC तो कनेक्ट होईन.
४. तो चेक करेल माझे माहिती आणि माझ्याकडे कॉल करण्यास पर्याप्त पैसे आहे का आणि OKAY देईन
५. आता मी तर माझ्या UP (उत्तरप्रदेश ) च्या मित्राला फोने केला मग तो उत्तरप्रदेश च्या MSC ला कनेक्ट करेल तिथे तो त्या मित्राचे लोकेशन त्याची सर्विस बद्दल माहिती चेक करेल OKAY असेल तर तो तो माझ्या मध्ये आणि माझ्या मित्र मध्ये मला जोडून देईन.
माहिती आवडली असेल तर कंमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा अधिक माहिती साठी vicharvrutt@gmail.com वर मेल करा.
Mala ya lekhamadhun khup changali mahiti milali.
Khup chan…
खूप चांगली अशी माहिती दिली आपण असेच नवीन विषयावरील लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा !
मराठी मध्ये टेकनिकाल लेख पहिल्यादाच वाचत आहे. हे समजायला खूप सोपी जाते. इंग्लिश न जमतात पण टेकनिकाल लेख अश्या पद्धतीने लिहिल्या वर खूप फायदा होतो मराठी वाचकांना.
धन्यवाद!