आज १४ एप्रिल नाही धम्मचक्र प्रवर्तन दिन नाही, ६ डिसेंबर तर नाहीच नाही किवा तसाच एखादा सण हि नाही मग राजगृहा ला हार का घालत आहेत? राजा शिवाजी विद्यालयाकडे जाताना एक मध्यमवयीन गृहस्थ एक वयोवृद्ध स्त्री, दोन तरुण, एक पुरंध्री राजगृहा ला हार घालत असताना मी पहिले तेव्हा केवळ कुतूहलापोटी मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा तो रुबाबदार उच्च बांधेसुध गृहस्थ मला म्हणाला.. आजचा दिवस आमच्याकरिता सोन्याचा दिवस आहे आजचा दिवस आमच्या जीवनात उगवला नसता तर मी आणि माझी हि आई आम्ही दोघे केव्हाच मरून गेलो आसतो.
काय आहे आज विशेष आमच्यासाठी
आजच्या दिवशी बाबासाहेबांनी माझ्या आईची केस जिंकली आज जो मी तुमच्या समोर उभा आहे तो एक पोलिस अधिकारी आहे अलिशान घर आहे गाडी आहे सर्व काही ऐश्वर्य आहे ते केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळे आहे म्हणून ज्या दिवशी बाबासाहेबांनी माझ्या आईची केस जिंकली त्या दिवसापासून दरवर्षी आम्ही सहकुटुब माझ्या या आईसह येउन राज्गृहाला हार घालतो आणि नतमस्तक होतो बाबासाहेबांनी केलेले उपकार आम्हाला केव्हाही विसरता येणार नाहीत त्या परिसस्पर्श झालेल्या मतोश्रीच्या मी पाया पडलो आणि विचारले आई तुमची केस होती तरी कसली? त्या पांढरीशुब्र साडी परिधान केलेली चेहऱ्यावर ऐश्वर्याची झळाळी आलेली ती आता खळकन डोळ्यात अश्रू आणून म्हणाली…
माझा हा दीपक असेल ४ -५ महिन्याचा त्याला घेवून मी बाबासाहेबांच्या पोयबावडी येथील दामोदर हॉल वर असलेल्या हापिसात गेले दारावर बालमचा पहारा होता त्यांना मी सांगितलेदादा मला बाबासाहेबासनी भेटायचं तेव्हा ते म्हणाले तू येडी कि खुळी? बाबासाहेब कुठल्या तरी विषयाचा अभ्यास करत चारी बाजूला पुस्तकाच्या गराड्यात बसलेत त्यांनी सक्त ताकीद दिली आहे कि गव्हर्नर जरी आला तरी आत सोडू नकोस अन तू म्हणतेस कि मला बाबासाहेबांना भेटायचं ? ये इकड बस त्याची पुस्तकातील समाधी मोडली कि मी त्यास्नी विचारून मग तुला आत बाबासाहेबांकडे सोडीन, बराच वेळ गेला पोटात भुकेचा डोब उसळला होता लेकरू अंगाला चिटकत होते त्याच पोट भरत नव्हत त्यान भोकाड पसरल होत माझेहात पाय काड्या वाणी झाल होत पोट खपाटीला गेल होत बांगड्या दंडा पावोत सरकत व्ह्यत्या मग अंगावर कुठल? लेकरू रडल्याचा आवाज ऐकल्याक्षणी बाबासाहेब गर्जले… अरे बालम, बाहेर कोण रडतंय? बाबासाहेब बाहेर एक तरुण बाई आपल्या मुलाला घेवून आली आहे ती एका जागेवर जवळ जवळ ४-५ तास झाले असतील बसलीय तीच मुल रडतय तिने हळू आवाजात खूप समजावलं पण ते मुल रडायचं थाबेना.. हे वाक्य ऐकल्याबरोबर बाबासाहेब स्वत ऑफिसच्या बाहेर आले अन म्हणले.. ये पोरी त्याला पाजत का नाहीस? त्याला पाजल्यानंतर तो शांत होईल.. अचानक बाबासाहेबांना समोर पाहताच ती धडपडत कशी बशी उभी राहून त्यांना हात जोडले डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले.. बाबा उपास मारीने दूधच आटलय तर याला कुठून पाजू?
बाबासाहेबांची कृपा
बाबासाहेबांनी त्या बाळाला जवळ घेतला तरा तरा चालत जाऊन पोयबावडीच्या कोपर्यातील दुधाच्या दुकानात गेले आजचे गॊरिशंकर छीतारमळ मिस्थान दुग्धालय.. आणि आपल्या हांतानी माझ्या या लेकराला दुध पाजले त्याने पण ढसा ढसा एका गलास दुध संमपवल बाबासाहेब परत हापिसात आले माझ्या लेकराला माझ्या हवाली केल व मला आत बोलावलं एका कागदावर माझे नाव लिहिले नाव लिह्तानाच बाबासाहेबांनी दचकून माझ्याकडे पहिलेतू विधवा आहेस? होय बाबासाहेब.. डोळ्यात आसव आणून मी म्हणले नवरा कोठे काम करीत होता? बाबा माझा नवरा बी ई एस टी मधी काम करत असताना त्यास्नी शॉक लागून ते गेले मी अर्ज विनंत्या केल्या पण कंपनी काय दाद देत नाय म्हणत्यात कि तुझ्या नवराच्या चुकीच्या कामामुळे त्याला शॉक लागून तो मेला त्याला कंपनी जवाबदार नाही बाबा माझा नवरा एकटाच होता आम्हाला दुसर कोणी बी नाय माहेरवरहि इस्तू पडलाय तिथ बी कोणी नाय एक मनी डोरलं होत इकल तव त्या पैशावर आज पावोत तग धरलाय बाबा मला व माझ्या लेकराला तुमच्याशिवाय जगात कोणी नाय मला मदत करा मी तुमच्या पाया पडते तवा बाबासाहेब माझ्यावर खेकसले माझ्या पाया पडू नकोस. पुन्हा शांतपणे मायेने म्हणाले..
बी ई एस टी वर फौजदारी खटला भरला
पोरी आता तू घरी जा त दाखवलेलेया कागदावरून सर्व माहिती झाली आहे काय करायचे ते मी करीन पुन्हा बाबासाहेबांना हात जोडून मी निघणार तो बाबासाहेबांनी पाच रुपायची नोट दीपकच्या बाळमुठीत खुपसली हे मुलाच्या दुधाकरिता, बाबासाहेबांनी बी ई एस टी वर फौजदारी खटला भरला. माझ्याकडून एक पैसा सुधा मागितला नाही तो खटला बाबासाहेबांनी मला जिकून दिला खटल्याचा निकाल असा लागला कि दुसर लग्न करेपर्यंत किवा तिचा मुलगा शिकेपर्यंत या कुंटूबाचा सर्व खर्च बी ई एस टी ने सोसावा..
खटला जिंकला तो सोन्याचा दिवस
लेका …। बाबासाहेबांनी खटला जिंकला तो सोन्याचा दिवस आजचा हाय जावा आमच आभाळच फाटलं होत तवा बाबांनी मला आधार दिला नसता तर या जन्माची काय परवड झाली असती म्हणून सांगू? आम्ही कवाच अन्न-पाण्यावाचून मेलो असतो नायतर जन्माची कुतर ऒढ तर नक्कीच झाली असती आताच्या पवशीला कुठली आय, कुठली बहिण आणि कुठली लेक, ……।
संदर्भ- जेव्हा आभाळ फाटले, पी.बी.पिसाळ
आनंद पाटेकर
आदर्श कॉलनी,अकोला