Headlines

मी आंबेडकरांना मानतो पेक्षा,मी आंबेडकरांना जाणतो असे करा ! Rather than I believe Ambedkar, make me know Ambedkar!

dr babasheb ambedkar

डॉ बाबासाहे आंबेडकर आणि भारत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारत (India) या दोन्ही गोष्टी स्परस्परांशी एवढ्या घनिष्टतेने  एकवटल्या गेलेले  आहे. भारतातील नागरिकांनी जर म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हेच मला माहित नाही तर त्याला स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही .कारण भारतीयांच्या प्रत्येक घराघरामध्ये व घरातील माणसामध्ये ‘जात’ या नावाची मानसिक किड येथे चिटकवून ठेवण्यात आलेली होती .                  

जातीचा उद्रेक

याच देशामध्ये जातीने माजवलेल्या थैमानामुळे येथील सर्व स्त्री आणि शुद्र जमाती ,(SC,ST,OBC)  हे सामाजिक घटक ,रोज नरकीय जीवन जगत होते.अशिक्षितेमुळे ,देवाचा कोप झाला म्हणून मी या जातीत जन्म घेतला असे समजून जीवन जगत होता.येथील स्त्रिया स्वतःला दासी समजून निमुटपणे नवऱ्याचा जाज,नवऱ्याच्या मार परमेश्वराचा कोप म्हणुन सहन करत होत्या.कित्येक स्त्रिया रडतांना सुद्धा तोंडावर पदर घेऊन स्वतःचा आवाज पदरात दाबून रडत होत्या. कारण तिला इथे मनसोक्त रडण्याचा सुद्धा अधिकार येथील मनुवादी व्यवस्थेने ,तिच्या कडून हिसकावून घेतला होता.हीच गत ब्राम्हण स्त्री किंवा शूद्र स्त्री सर्वाची सारखीच गत होती .

आज हि परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात बदलेली आहे असे नाही.हीच परिस्थिती आजही ब-याच घरा-घरा मध्ये पाहता येईल पण समाजामध्ये स्त्री वर समाजा समोर अत्याचार करणे ह्या प्रकाराला मात्र लघाम घातला आहे.तो फक्त आणि फक्त संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे .

जात काय आहे ?

जात :हि बुद्धीच्या दुबळेपणाची लक्षणे आहे.” Cast is sickness of mind “-Dr.B.R.Ambedkar.

जातीचा आणि येथील हिंदू म्हणुन घेणाऱ्या समाजाचा एवढा घनिष्ठ संबंध आहे की, जर येथील सरकार म्हणत असेल की,आम्ही हिंदू राष्ट्रांची निर्मिती करून जात संपुष्टात आणू.तर हे येथील राजकारन्यांनी तुमच्या समोर ठेवलेले खरकटे पात्र आहे हे गोष्ट येथील हिंदूला समजायला पाहिजे.

आजही भारत हा मनुस्मृतीत हिदुस्थानच आहे.आजही येथील डॉक्टर,वकील,अधिकारी राजकार्नियांचे मेंदू जाती,धर्माच्या अस्तित्वाने सडत आहे. हा माझा आरोप नसून हि सत्यता आहे.आज २१ व्या शतकातही या हिंदुस्थानातील बरेच माणसे स्वतःला मानसिक गुलामीतून स्वातंत्र्य करून घेऊ शकले नाही.

भारतातील लोकशाही

येथील सरकार, भारत देश हा लोकतांत्रिक देश आहे,हे दाखविण्याचे कित्येक वर्षापासून नाटक करत आलेले आहे, असे नसते तर घरवापसी ,हिंदुवाद, बाबरी,श्रीकृष्ण आयोग ,खैरलांजी हत्याकांड सारे प्रसंग येथील लोकतांत्रिक देशामध्ये कसे होतात.का आजही मागासवर्गीयांना छळ, द्वेष सहन करावा लागतो .प्रस्थापित संख्येमध्ये हे लोक येऊच नये म्हणुन येतील मनुवादी समाजव्यवस्थेचे पुढारक येथील मनुवादी सरकार स्वतःला या हिंदुस्थानचे मालक समजतात.ते हे समजत नाही की,तुमच्या मतामुळे ते निवडून आलेले आहे.ते समजतात की येथील मनुग्रासित हिंदुस्थानचे आम्हीच आणि आमचे पूर्वज हेच खरे संस्थापक आहे.आणि तुम्ही सांगा कोणता संस्थापक आपल्या या संस्थेतील चपराश्याला, ऑफिस मध्ये कार्यालयाला मध्ये झाडू मारन्याऱ्याला या संस्थेचा (हिंदुस्थान) संस्थापक बनविल्यास तयार राहील ? नाही कोणीच हे असे होऊ देणार नाहीत.

संविधाना मुळे संधी

मात्र आज डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सर्वाना सामन संधी मिळत आहे.आणि हाच कार्यालय साफ करणारा चपराशी,चपराशी नाही झाडू मारणारा सफाईगार गट येथील हिंदुस्थान वादी संस्थेचा संस्थापक होत असेल तर इतर या संस्थेचे अधिकारी जे स्वतःला येथील वंशिक संस्थापक समजतात .ते स्वतःहा चपराशी ,सफाईगार,व त्याच्या खालील पद घेण्यास तयार होत नाहीत,परंतु पर्याय नसल्यामुळे हे लोक मुखवटे बदलून कामे करतात.

येथील व्यवस्थेला तेव्हाच लोकशाही म्हणता येईल जेव्हा येथील राजकीय प्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले खरे प्रतिनिधी हेच खरे असुन त्याला पूर्णपणे मदत करतील पण हे या जातीयवादी.धर्मवादी.लोकांकडून समोरील ५० वर्षे अजूनही शक्य नाही.

SC,ST,OBC मधील मांग,महार,चांभार,कुणबी,तेली,माळी,साळी व ईतर ६००० मागासवर्गीय यांच्याकडे जोपर्यंत या संस्थेचे अधिपत्य येत नाही तोपर्यंत एकटा महार,एकटा चांभार,मांग एकटा तेली,माळी,कुणबी येथील ८०%बहुजन समाज,मनुवादी उच्चवर्णीयांच्या संस्थेतील लोकांना बदलू शकत नाही.ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.येथील तळागाळातील लोक हेच मागासवर्गीय आहेत.एक मागासवर्गीय या संस्थेमध्ये दाखल झाल्यास काही फारसा बदल घडेल असे मला वाटत नाही.त्याला त्याच्याच विचाराचे बाकी सदस्य तळागाळातून आलेले असणे फार महत्वाचे आहे. आज प्रतेक राजकारणी म्हणतात की,आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानतो.त्याच बरोबर काही वेगवेगळ्या नावावर चळवळी करणारे सुध्दा हेच म्हणतात.याने काही फारसा फरक पडणार नाही.येथील सवीधानाचे शिल्पकार मागासवर्गीय होते म्हणुन मानणे हा एक दांभिक प्रकार आहे.                                                                           

स्वतंत्र विचाराची गरज

कदाचित येथील राजकारणी स्वंतंत्र डोक्यांनी विचार करणारे जर या भारता मध्ये असते तर त्यांनी बिंडोकासारखे कामे केली नसती.२६ जानेवारी हा भारत लोकतंत्र म्हणुन दिवस साजरा करतो मात्र ज्या मानवाने या देशाला सविधान देऊन खऱ्या अर्थाने लोकशाही दिली अशा मानवाचे कार्य दाखविण्यासाठी येथील बुद्धीग्रस्तीत राजकारणी व अधिकारी साधा फोटो लावुन त्यांची तोंडी माहिती सुध्दा द्यायला धजत नाही यावरून येथील राजकर्ते आणि अधिकारी वर्ग उच्चवर्णीयांचे मानसिक गुलाम गुलाम आहेत हे आपल्या लक्षात येते.                                                                                                            

एखादा कामगार,सफाईगार वर्ग जर संस्थापक झाला तरीही तो त्यांच्यासाठी त्यांचा गुलामच असला पाहिजे व यापुढे असे लोक आमच्या प्रस्थापित संखेमध्ये हे लोक येउच नये म्हणुन यांची ओळख लपवूनच ठेवावी या कारणाने हि मतलबी लोक मतलबापोटी बहुजन नेत्यांची ओळख पुसण्याचे काम करत आहे.

मानसिक गुलामगिरी खरे कारण

आजही येथील भोळी –भाभळी मानसिक दैववादी गुलाम जनता स्वतःला स्वातंत्र्य म्हणुन गुलामगिरी झुगारून लावण्याची ताकत दाखवत नाही .आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील उच्चवर्णीय प्रस्थापितांच्या घरामध्ये सांगण्यात येत नाही.आणि सांगण्यात जरी आला तरी या भारताचे संविधान,घटनापती म्हणून नव्हे तर तो मागासवर्गीयांचा कैवारी म्हणूनच दाखविल्या जाते.हे मात्र आपले दुर्भाग्य,येथील मागास्वर्गीयाना स्वतःच्या कमाईचे सुद्धा फळ मिळत नसेल तर हे प्रस्थापित वर्ग तुमच्या कामाचा नाही हे आपण समजले पाहिजे.

नवबुद्ध म्हणुन घेणारे बरेच इथे डॉ.बाबासाहेबांना मानतात,त्यामध्ये इतर मागासवर्गीय समाज,व इतर समाज हे म्हणतात की,खरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो त्यांच्यामुळे आम्ही शिकू शकलो.आज कमवतो आहे.पण हाच मानणारा समाज दैववादी पण आहे.तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानतो परंतु जातीलाही मानतो म्हणजेच देव मानणारे किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे फक्त नाटक करू शकतात की,आम्ही येथील जातीवाद मानत नाही.किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमचे उद्धारक आहे असे सांगत असतील हे त्याचे सरळ सरळ नाटक राहील.

डॉ बाबासाहेबांचे दैवीकरण

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानून या लोकांनी या हिंदुच्या ३३ कोटी मध्ये एक नवीन देव जमा केला,अन्यथा ३३ कोटी देव सांडून या देवाला पुजाला लागले याने काही एक फरक पडणार नाही.या भारतातील प्रत्येकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानण्या पेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजणे फार गरजेचे आहे.हे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानून दैववादी बनून ,स्वताचे कार्य इथे संपवित आहे.व डोळे लाऊन भविष्य घडवीत आहे.असे म्हण्यास वावगे नाही.

आजही येथील मागासवर्गीय डॉ.बाबासाहेबांच्या कार्यामुळे मोठे झालेत मात्र चार चौघांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे माझा अपमान करणे असे समजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे टाळतात.मात्र काही लोक जे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजलेत त्यांना वाचले हे लोक आजही कुठल्याही सामाजिक प्रसंगी आपल्याला व इतर सर्वांनाच डॉ.बाबासाहेबाच्या कार्याची व आपल्यावर केलील्या उपकाराची जाणीव करून देते हेच लोक खऱ्या अर्थाने माणुसकीचे चळवळीचे वाटेकरी आहेत.असे मला वाटते.

अन्यथा लोभासाठी बाप लपवणारे आजही SC,ST,OBC मध्ये आहेत.त्यामध्ये मांग महार चांभार गोंड कोरकू आदिवासी आहेत.मात्र हेच लोक आपआपल्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानण्याचे ढोंग करतात.त्यांना देव म्हणून पूजतात मात्र नाव घेऊन त्यांचे माझ्यावरच उपकार फार उपकार आहेत हे तोंडातून कढायला मात्र लाजतात.अश्या मागासलेल्या  बुद्धीच्या लोकांचे मागासलेपण कधी दुर होईल.

काय केले पाहिजे ?

प्रत्येकाने डॉ.बाबासाहेबांच्या कार्याचा अभ्यास केल्यास तो कुठेही कोणत्याही क्षेत्रात असो तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाणतो तो स्वतःचा आत्मविश्वास घेऊनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घेतो काही हुशार असतीलही जे म्हणतील की नाव घेण्याने किंवा नाही घेण्याने काय फरक पडणार आहे ?        फार फरक नाही तर फार बदल होणार आहे,येथील लोक दैववादी ,कर्मवादी होतील. त्यानाही त्या गोष्टीचा अभिमान वाटेल की,कुठलीही जाती श्रेष्ठ व कनिष्ठ नसून येथील सृष्टीचा केंद्रबिंदू हि मानवी बुद्धी आहे व त्याने बुध्दीवरच विश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे .

म्हणून माझ्या सर्व मित्र –मैत्रीनिंना माझ्या लहान-मोठ्यांना,माझ्या भारतीयांना.मी हृदयाच्या करुणेने कडकडुन विनंती करतो की,कुपया मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानतो म्हटल्या पेक्षा मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्याला जाणतो.असे म्हणा त्यांना वाचा व त्यांना समजा व तेव्हाच कुठे आपण आपआपल्या घराचा समाजाचा देशाचा खऱ्या अर्थाने उद्धार करू असे मला वाटते.

कार्यकारी संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *