Headlines

मानोरा अर्बन निधी बँक मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Women’s Day celebration in Manora

मानोरा येथील पंचायत समिती शिक्षक सभागृहामध्ये मानोरा अर्बन निधी बँक., मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. ०२ मार्च २०२३ रोजी नियोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे प्रमुख मार्गदर्शक तथा संचालक, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश चव्हाण आणि मार्गदर्शिका प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व सौंदर्य उपचार तज्ञ डॉक्टर सौ निकिता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनात पार पडला. त्यावेळेस बँकेचे CEO श्री. योगेश राठोड, जनरल मॅनेजर कु. प्रणाली ढबाले, शालिकराम चव्हाण, नितेश राठोड, वचिष्ठ राठोड, श्रेयस सोळंके, अजय राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते.


त्यावेळी डॉ. महेश चव्हाण यांनी संखीना सखी संकल्पना मागची पृष्ठभूमीका समजवून सांगताना स्त्री लक्ष्मी स्वरूप (धन), स्त्री व्यवहारात चोख, बचतीचे महत्त्व स्त्रियांना कळते, स्त्री संसाराचा पाया (घर चालवते) आणि देशाचे अर्थतंत्र सुद्धा ( निर्मला सीतारामन अर्थमंत्री)
असे संबोधन केले. व बँकेचे मुळ उद्देश सखी मार्फत प्रत्येक गावात मिनी बँक सुरू करून गावातल्या शेवटच्या माणसपर्यंत बँक आणि आर्थिक सोयीसुविधा पोहचवीने त्यांना आर्थकदृष्टया सक्षमीकरण करणे.

गावातल्या स्त्रीला सखी म्हणून गावातच प्रतीष्ठीत वा हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे. डिजिटल रोजगार कडे वाटचाल करणे, सखी मार्फत जास्तीत जास्त गरजू स्त्रीला सुशिक्षीत बरोजगारांना कर्ज वाटून ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करणे. इत्यादी मार्गदर्शन केले व तसेच आरोग्य विषयक
स्त्री म्हणजेच सखी मार्फत संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक व आरोग्याचे नियोजन करणे हे ही तितकेच गरजेचे आहे असे सांगितले.

नंतर डॉ. सौ. निकिता महेश चव्हाण यांनी सखींसोबत चर्चा करून त्यांना चूल आणि मुल यामध्ये गुरफटून न राहता आपल्या पायावर उभे राहून समाजामध्ये एक वैभव निर्माण करावे, तसेच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत पाल्यांना उच्च शिक्षित करावे, असे प्रतिपादन केले.तसेच महिलांनी घराच्या बाहेर पडून आपले वैशिष्ट्य निर्माण करावे, असे मत देखील डॉ. सौ चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी सखी प्रशिक्षण शिबिरात मान्यवरांच्या हस्ते सखींना भेट वस्तू देवून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *