Headlines

खुशखबर : शेतीसाठी मिळणार वीज मोफत free electricity for farmer

खुशखबर : शेतीसाठी मिळणार वीज मोफत free electricity for farmer

आता महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीला लागणारी वीज दहा तास वीज देण्यासाठी निर्णय लवकरच घेतल्या जाईल अशी माहिती मिळाली असून सध्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्याचबरोबर शेतकरी नेते सिकंदरशहा यांनी पण त्यांचे मत मांडले शेतकऱ्यांना मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची नाराजी दिसत आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून सह्याद्री अतिथग्रह येथे बैठक घेऊन विचार करण्यात आलेला आहे .

बैठकीला उपस्थिती अब्दुल सत्तार व इतर

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार ज्ञानराज चौगुले ,दादा भुसे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी किसान जिहादी विनायकराव पाटील, कराडचे पंजाबराव पाटील ,शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा ,ओम प्रकाश सुरवसे, राजेंद्र शिंदे,राजन क्षीरसागर, नेताजी पाटील , ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश दाळिंबे ,उत्तम खबाले, आमदार ज्ञानराज चौगुले .

योजना काय असणार

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता शेतीसाठी १० तास वीज मोफत दिल्या जाईन , या विचारात घेतलेल्या निर्णयाने सर्व शेतकरी खुश आहेत.

तात्काळ समिती स्थापन करणार

आम्ही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोरही मांडल्या त्यानंतर त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी ही सरकारकडून लवकरच समिती तयार करण्यात येईल.

समिती मध्ये मंत्री अधिकारी आणि पाच शेतकरी यांचा समावेश असेल , या दिलेल्या दिलासाने सर्व पंचकोशीतील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

आणि सर्व जण हा निर्णयाची अंमल कधी करताय याची आस धरून बसले आहे. त्यांनी लवकरात लवकर योजना राबवावी असे शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्षही सिकंदरशहा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *