??निसर्ग रडतो ??
माणुसकीचा धर्म बुडाला
फसवणारांचा सुळसुळाट वाढला
धर्माच्या गुंगीत ढकलून
लुटारु लुटू लागला
बहुजन अज्ञानात रूतू लागला
हक्क अधिकार जाणून
घेण्यात रस नाही उरला
धर्माच्या नशेत
हक्क अधिकार विसरू लागला
जाती धर्मात तेढ वाढला
माणूस माणसाचा द्वेष करु लागला
बहुजन त्याला
चांगले दिवस म्हणू लागला
शेटजी भटजी
महागाईचा वणवा पेटवू लागला
बहुजन होरपळून गेला
टाळ्या थाळ्या दिवे
लावून नाचू लागला
अध्यात्माच्या जगात हरवून
अल्प संतुष्ठी झाला
संविधानात विकास
त्यालाच विरोध करू लागला
म्हणून निसर्ग रडुन
आपला शोक व्यक्त करु लागला
रचना :- अशोक शंकर नागकीर्ति
दिनांक :- २१/३/२०२३
मोबाईल :- 7039120462
- हृदयस्पर्शी : माणसांची कर कदर गझल – A Marathi Poem Respect Humanity
- निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi
- कार्तिक मास गावबोली भाषेतील कविता – माणिक उ. सोनवणे Gavboli Kavita Kartik Mas Manik U Sonvane
- स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कविता :-रामहरी पंडित © ( चंद्रांशू) shivaji maharaj
- सोबत तुझी सरल्यावर, हे आयुष्य तरी उरू नये !