दुष्काळ अतिवृष्टी निधी
शेतकरी बरयाच दिवसापासून वाट पाहत असलेल्याला दुष्काळ निधीचा अतिवृष्टी व त्यानंतर पाऊस व शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झालेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 12000 कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही केली आहे.
बँक शेतकऱ्यांना रक्कम देत नाही
परंतु तो दुष्काळ निधी आता पडण्यास सुरवात झाली असून राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी काही भरपाई दिली आहे ती भरपाई थेट बँकेमध्ये जमा होत असते अशाच प्रकारे काही शेतकऱ्यांचे कर्ज काढलेले खाते आहेत त्या खात्यामध्ये गेल्यानंतर काही बँका शेतकऱ्यांना रक्कम देत नाही.
अब्दुल सत्तार यांचा आदेश
त्यामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सर्व बँकांना आदेश दिले की जे शेतकऱ्यांचे कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम बँकांनी जमा करून न घेण्यात यावी.
तसेच सोयगाव व सिल्लोड तहसीलदार यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा सहकारी बँका तातडीने बैठक घेऊन याबाबत बँकांना सुचित करावे अश्या सूचना येथील तहसीलदाराला दिल्या आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या
सत्तार हे मतदार संघात दौरा करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ येऊन आम्हाला काही अडचणी आहेत हे सांगितले. यामधील सरकारने टाकलेले पैसे कसे आमच्यापर्यंत पोहचत नाही हे सांगितले. याच अडचणी लक्षात घेऊन तहसीलदार यांनी तातडीने बँकांना अनुदान कर्ज खात्यात जमा करण्याची सक्ती करू नये असे आदेश दिलेले आहेत.
बँकांना सुनावले
जर सूचना देऊन हि शेतकऱ्यांचे अनुदान जर कर्ज खात्यात जमा करण्याची सक्ती केली तर अशा बँकांना कारवाई करावी लागेल