Headlines

बाजारात शेतकऱ्यांचे हाल .हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव

farmers in the market. Guaranteed price of 5 thousand 335 rupees by the government




नुकताच शेतकऱ्यांचा हरभरा सोंगून झालाय शेतकरी आता हमीभाव मागण्यास मार्केटमध्ये जात आहे पण इथे मात्र शासनाचा हमीभाव आणि बाजारात विकल्या जाणारा भाव याच्यामध्ये तफावत दिसून येत आहे.

हरभऱ्याला शासनाचा हमीभाव ५३२५रुपये इतका असून बाजारात हरभरा ४३०० प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. म्हणजे सरासरी इथे शेतकऱ्यांचे जवळपास एक हजार रुपयाची नुकसान होत आहे.

सरकारच्या माध्यमातून नाफेड च्यावतीने पद्धतीने नोंदणी सुरूझालेली मात्र अद्याप या ठिकाणी खरेदी सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकरीनाविलाजाने आपला खुल्या बाजारात विकत आहे.

नाफेडच्या वतीने राज्यात संस्थेकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जातो. यामध्ये मूग उडीद सोयाबीन तांदूळ कापूस हरभरा पिकांचा समावेश असतो.

शेतकऱ्यांचा हरभरा शेतातून निघालेला आहे पण अद्याप पर्यंत नाफेडकडून बऱ्याच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत अशी माहिती मिळत आहे.

शेतकरी विविध संकटांना सामना करावा लागत आहे कांद्याचा दरामध्येहीतीच तफावत आहे दरात घसरन शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यामुळे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी मागणी केली जात आहे.

आणि सततच्या होणाऱ्या हवामानामुळे शेती पिकावर आघात होत आहे आणि या मध्ये सुद्धा शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान साठी सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांना यासाठी शासनाने काही ठोक पावले उचलावी अशी शेतकरी समुदायाकडून सतत मागणी होत आहे.

One thought on “बाजारात शेतकऱ्यांचे हाल .हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव

  1. I want to to thank you for this very good read!! I definitely enjoyed every bit of it. I have you bookmarked to check out new things you postÖ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *