सोयगाव शहरातील गावकऱ्यांना जागृत करण्यासाठी सोयगाव येथे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान सर्वेक्षण अंतर्गत शपत घेऊन स्वच्छता बाबत दिनांक ३१-३-२०२३ रोजी वार शुक्रवार या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
उपस्थित कोण कोण ?
कार्यक्रमात उपस्थित मुख्य अधिकारी रमेश जसवंत तसेच नगराध्यक्ष नगरपंचायत कर्मचारी भगवानराव शिंदे ,किशोर मोरे, राजू जंजाळ, राजेश मानकर, समाधान गायकवाड ,दिनेश शेवाळे ,नामदेवराव गायकवाड , सर्व सफाई कर्मचारी महिला ,सर्व कर्मचारी आशा सेविका उपस्थित होते.
कुठ पासुन कुठ पर्यंत निघाली रॅली व काय संदेश दिला
नगरपंचायत पासून ते वाल्मीक चौकापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली नगरपंचायत कार्यालयामध्ये स्वच्छतेबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात तिथे सांगण्यात आले की निरोगी मनाचा हा विकास होतो म्हणजे स्वच्छता ही केवळ व्यक्तीच्याच विकासातच नाही मदत करत नाही तर ती देशाला प्रगतीकडे देण्यासाठी मदत करते हाच उद्देशाने 31 मार्च रोजी सोयगाव येथून नगरपंचायत मधून ही रॅली काढण्याचा उद्धेश आहे .
स्वच्छ भारत अभियान केव्हा सुरु करण्यात आली ?
स्वच्छ भारत अभियान ही योजना भारत सरकारने सुरू केली असून ही राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता मोहीम चालू आहे आणि आपला देश निरोगी राहावा याच उद्देशाने आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोंबर 2014 रोजी महात्मा गांधीचे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरू केले याच मोहिमेचा उद्देश घेऊन गावागावात देशा देशात स्वच्छ व निरोगी देश राहण्यासाठी ही मोहीम सुरू आहे