Headlines

जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने गणेश मोरे यांचा सत्कार ! Z.P. School Karli Felicitates Ganesh More: A Celebration of Achievements

vicharvruttlogo

कार्ली प्रतिनिधी:-

???????????????????????????????मानोरा तालुक्यातील ग्राम कार्ली येथील अनु.जमाती मधील गणेश मोरे यांची प्रथम प्रयत्नातच पी.एस.आय.पदी नियुक्ती झाल्या बद्दल दि.१५ एप्रिल २०१५ रोजी जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने मुख्याध्यापिका सौ.आशाबाई हिंगणकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य उपस्थिती साप्ता.विचार वृत्त चे संपादक विद्यानंद राऊत तथा सरपंच दत्ता तायडे, उपसरपंच देवकर,पोलीस पाटील, ग्राम शिक्षण शाळा समिती, व्यवस्थापन समिती व गावातील अनगिनत प्रतिष्ठीत नागरिक उपस्थीत होतेत.

???????????????????????????????

गणेश मोरे यांचं प्रभावी आणि नवीन पिढीला दिशा देणारे संबोधन

प्रसंगी बोलतांना गणेश मोरे म्हणालेत की,प्रतेक व्यक्ती मध्ये एक अधिकारी असतो,किंबहुना अधिकारी बनण्याची कुवत असते.त्यासाठी गरज आहे सकारात्मक प्रयत्नाची आणि हे प्रयत्न जर आपण प्रामाणिक पणाने केलेत तर निश्चितच आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहाणार नाही.

त्याचा स्वतःचा प्रवास 

याचे जिवंत उदाहर मी स्वताच आहे.कारण इयत्ता ७ वी मध्ये मी कसाबसा वरपास झालो, आणि बारावी पास केल्यावर केवळ पैशाअभावी डी.एड.ला जाऊ शकलो नाही.गावामधून निगेटीव गोष्टी जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे दोन वर्षे रोज मजुरी केली तरीही जिद्द सोडली नाही नंतर उच्च शिक्षित झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि प्रथम प्रयत्नातच मला यशप्राप्त झाले, या यशाचे कुणीतरी कौतुक करावे असे मनापासुन वाटत होते मला आशा होती की, गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्या कडुन मला शुभेच्छा मिळतील,परंतु माझा हिरमोड झाला.मात्र साप्ता.विचार वृत्तने माझ्या यशाची दखल घेतल्यामुळे मनस्वी अत्यानंद झाला.

यशाचे श्रेय माझे आदर्श शिक्षक वृंद,आई वडील आणि मित्र परिवार आहेत

आणि आज जी.प.शाळेने माझा सत्कार घडवुन आणला त्याबद्दल मनापासुन समाधान लाभले.???????????????????????????????माझ्या यशाचे श्रेय माझे आदर्श शिक्षक वृंद,आई वडील आणि मित्र परिवार आहेत.असे त्यांनी बोलतांना व्यक्त केले.याप्रसंगी साप्ता.विचार वृत्तचे संपादक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर संचालन श्री.दत्ताभाऊ चव्हाण सर यांनी केले,प्रस्ताविक श्री.वासुदेव चव्हाण सर यांनी केले तर आभार श्री.मोहन कोल्हे सर यांनी मानलेत प्रसंगी मस्के सर, बुरशे सर, सौ.दीडशे मडम सोबतच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थीत होतेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *