तपशील
सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बरीच शेतकऱ्यांची नुकसान होत आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये सर्वत्र अवकाळी पावसाने खूप पिकाचे नुकसान केलेली आहे.
परत अंदाज पाण्याचा
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे 24 मार्चपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता दिलेली आहे व तसेच सरकारकडून काही मदत मिळण्यास यंत्रणा त्यापर्यंत पोचलेली नसून आज सकाळपासून मुंबई नवी मुंबई ठाणे ठाण्याचं अनेक शहरामध्ये पावसाची हजेरी लावली.
राज्यात आज दिनांक २१ मार्च २३ हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता होती परंतु महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजेच्या गर्जनासह पाऊस पडला.
मराठवाड्यात वादळी पावसाने सुरू असलेल्या बऱ्याच दिवसापासून सध्याच्या रब्बी पिकासह फळ पिकाचेही बऱ्याच जिल्ह्यमध्ये बरेच प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे तसेच मागील काही दिवसापासून विजेच्या वाऱ्यासह गारपीट चालू आहे.
परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकरी मेहनत घेऊन जेव्हा घास घेण्याची वेळ येते तेव्हा असे संकट येते
अजून जिल्ह्यात अवकाळी पाउस जास्त प्रमाणात दिसून येत आहे तसेच जिल्ह्यांमध्ये 14 ते 19 मार्चच्या दरम्यान झालेल्या वादळी व गारा पाऊस झाला असून त्यामध्ये बऱ्याच माणसे व जनावरे मृत्यूमुखी व जखमी सुद्धा झालेले आहे .
परंतु सरकारने पंचनामे करण्याचे काम खूपच हळू चालण्याच्या कारणाने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे .
पंचनामाचे कुठे झाले व कुठे नाही व कशामुळे ?
राज्यमध्ये बऱ्याच भागामध्ये पंचनामे झालेलले नाही असे दिसून येत आहे .
मागिल काही दिवसापासून पेंशन साठी बरीच संघटना व सहकारी कर्मचारी यांचा संप चालू असून आंदोलन चालू आहे म्हणूनच संपावर पंचनाम्याचा असर बाकीच्या जिल्ह्यना दिसून येत आहे
विमा काढला असेल तर क्लेम कसा कराल नसेल काढेल तर नुकसान भरपाई कशी कराल
जर शेतकऱ्यांचा पीक विमा काढला असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे आपण इथे समजून घेऊ शकता कि आपण पीक विमा साठी कसे पात्र आहेत आणि ते घेण्यासाठी काय केले पाहिजे .
तीन दिवसाच्या आताच आपल्याला पीक विमा साठी अर्ज करावा लागणार आहे अन्यथा तो ग्राह्य धरल्या जाणार नाही
पीक विमा हे दोन पद्धतीने केल्या जाऊ शकते इंटरनेट म्हणजे Online आणि ऑफलाईन
१. Online प्रक्रिया
१.१ आपण जर स्मार्ट मोबाइल वापरात असाल तर आपल्याला प्ले स्टोरे (Play Store ) मध्ये जाऊन (Crop Insurance) क्रॉप इन्शुरन्स हा अँप डाउनलोड करावा लागेल.
१.२ नंतर ते इन्स्टॉल करा त्या अँप ला ओपन करा CROP LOSS यावर क्लिक करा
१.३ तुमचा मोबाइलला नंबर द्या OTP द्या
१.४ रब्बी पीक यावर निवड व वर्ष २०२३ द्या
१.५ Fasal Vima Yojna निवडा
१.६ Maharashtra राज्य निवड Next वर क्लिक करा
१.७ आता तुमच्यासमोर फॉर्म येईन From where did you enroll? ह्या पर्यायांमध्ये Bank, CSC सीएससी, farmer ऑनलाईन intermediary हे पर्याय दिसतील यापैकी योग्य तो पर्याय निवडा मी या ठिकाणी पिक विमा हा सीएससी मधून अप्लाय केला असल्यामुळे या ठिकाणी सीएससी निवडून घेतो जर तुमचा पिक विमा बँक बँकेने भरला असल्यास बँक हा पर्याय निवडून घ्या
१.८ पोलिसी नंबर , पिकाची माहिती , तुमचे ठिकाण (लोकेशन ) Permission द्यावे लागेल मोबाइल मधून, तसेच नुकसान कशाने झाले (type of Incident ) तिथे Unseasonal rain (अवकाळी पाऊस ) , दिनांक , पिकाची स्थिती काढलेले किंवा उभे इत्यादी माहिती भरावी लागेल.
१.९ नंतर तुम्हाला upload photos / Videos (फोटो /विडिओ फाईल जोडा ) करायचे आहे .
अस्या प्रकारे online Crop Insurance Claim तुम्हाला करता येईन.
भरपाई जर केली नसेल तर तुम्हाला तुमच्या तालुकयातील तहसील कार्यालयात जाऊन तिथे अर्ज करून व त्यासोबत कागदपत्रे खालील कागद पत्रे द्यावी लागतील.
१ आधार कार्ड
२ शेतातील नुकसानीचा फोटो
३ पासबुक
३ सातबारा
हि माहितीला गरजु पर्यंत पोहचावी ,,,
- YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल
- नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान
- भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात? Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली