सर्वसमावेशक आघाडीचा विजय, ठाकरे-पाटील पॅनलचा पराभव |
शिवसेनाप्रणीत परिवर्तन आघाडीचे खाते उघडले नाही |
मानोरा : मानोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसमावेशक आघाडीने १८ पैकी १७ जागा पटकावून सत्ता परिवर्तन केले, तर मागील १३ वर्षांपासून अधिराज्य गाजविणारे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या शेतकरी पॅनलला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
मानोरा तालुक्यात ग्रामपंचायती, जिनिंग-प्रेसिंग, बाजार समिती, खवि संघ आदी निवडणुका पार पडल्या. यात स्व.भीमराव पाटील सहकारी जिनींग, जि.मध्य.सह. बँक आदी सहकार क्षेत्रातील संस्था ठाकरे व पाटील, चव्हाण गटाने काबीज केल्या. त्याच विजयाच्या जोरावर १३ वर्षांपासून ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी मागील महिन्याभरापासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या मतमोजणीत मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्ट झाले.
ठाकरे, पाटील, भोजराज चव्हाण गटाच्या १७ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. यात माजी आमदार अनंतकुमार पाटील यांचे चिरंजीव विजय पाटील, भोजराज चव्हाण यांचे चिरंजीव विक्रम चव्हाण, माजी सभापती प्रेमसिंग राठोड, माजी उपसभापती नीळकंठ पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
एकतर्फी विजय प्राप्त केला
अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला. या विजयासाठी सहकार नेते सुरेश गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, भाजपचे नेते महादेवराव ठाकरे, केशवराव नाईक, शेषराव नाईक, नीळकंठ पाटील, भाऊ नाईक, अशोकराव देशमुख, दुधराम पवार, डॉ.राठोड, अरविंद राऊत, इफ्तेखार पटेल, सुरेंद्र देशमुख, राजु नेमाने, प्रकाश राठोड, अभय राठोड, अशोक चव्हाण, मधुसूदन राठोड यांनी बाजू लढविली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील विजयी उमेदवार
■ डॉ.संजय राठोड, राजेश नेमाणे, गोविंद चव्हाण, विलास चौधरी, सुदाम रामधन चव्हाण, व्दारकादास नामदेव राठोड, हरसिंग प्रताप चव्हाण, राजू विष्णुजी पाटील, भारत रमेश आडे, तुषार अरविंद पाटील, सुनील हरिभाऊ राठोड, शांताबाई बाबूसिंग पवार,विद्याताई मोहन राठोड, रामराव नारायण राठोड, अनु-जाती व जमाती प्रवर्गातून संतोष प्रल्हाद पांडे, व्यापारी -विजयकांत धनराज राठी, अडते-राजकुमार बिहारीलाल राठी व हमाल-मापारी प्रवर्गातून प्रभाकर श्यामराव चिस्तळकर. निकाल ऐकण्यासाठी जमलेली गर्दी. विजयी मिरवणुकीत जल्लोष करताना पदाधिकारी व कार्यकर्ते. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे व माजी आमदार अनंतराव कुमार यांच्या सर्मथकांची सत्ता गत १३ वर्षांपासून होती. २0१५ च्या निवडणुकीत ठाकरे-पाटील यांची सत्ता सर्वसमावेश आघाडीने उलथून टाकली आहे.
■ माजी आमदार अनंतकुमार पाटील यांचे चिरंजीव विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर राऊत, माजी सभापती भोजराज चव्हाण यांचे चिरंजीव विक्रम चव्हाण, माजी सभापती प्रेमसिंग राठोड, माजी उपसभापती नीळकंठ घाटगे यांना पराभूत व्हावे लागले.
नवीन चेहरे सत्तेत
■ गोविंद गोवर्धन चव्हाण यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच उमेदवार नवीन संचालक आहे. सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार
सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मतदार संघा
■ सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मतदार संघातून अल्पसंख्याक समाजाचे डॉ.संजय चंदनसा रोठे हे सर्वाधिक २२१ मते घेतली तर सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून भारत उमेश आडे २७0, मते घेतली. तर आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून सुनील हरिभाऊ राठोड ३१६ मते घेतली. संतोष प्रल्हाद पांडे २८५ मते घेतली. हमाल, मापारी मतदार संघ, विजयी झालेले प्रभाकर चिस्तकळकर, यांना २७ मते आहे उर्वरित सगळ्याची बेरीज केली तर ५0 टक्के आहे.
मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतुन
■ मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिवसेना प्रणित परिवर्तन आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली होती; मात्र या आघाडीला खाते उघडता आले नाही.