17 फेब्रुवारी रोजी ECI ने शिवसेनेचे अधिकृत नाव आणि त्याचे चिन्ह “धनुष्य आणि बाण ” वाटप करण्याच्या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या अर्जाला परवानगी दिली.
शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली कि निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा त्याची सुनावणी उद्या दुपारी साडे तीन वाजता होणार आहे.
वरिष्ठ वकील कपिल सिब्बल उद्धव ठाकरे व टीम यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. ठाकरे यांचे कार्यालय आणि पक्षाची बँक खाती जप्त केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर तातडीने सुनावणीची मागणी केली.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 21 फेब्रुवारी सुनावणीनंतर शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे. तर कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटच हा खरी शिवसेना असल्याचेही वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे.
22 फेब्रुवारी ला महेश जेठमलानी ते शिंदे गटाकडून वकिली करतील आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय कसा रक्षित करता येईन असा प्रयन्त करतील बाकी उद्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय काय राहील यावर सर्वांचे लक्ष वेधून आहे .
सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाकडून निर्णय देतील कि शिंदे गटाकडून हे आता २२ फेब्रुवारी २०२३ दुपार नंतर समजेल.