Headlines

विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍याविरुद्ध गुन्हा ! Consequences of Unruly Behavior with Female Students

मानोरा: शिक्षणासाठी बसने मानोरा येथे जात असलेल्या कु पटा येथील विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍याविरुद्ध मंगळवार, १ सप्टेंबर रोजी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुपटा येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी मानोरा येथे रोज बसने प्रवचास करीत असतात.

तपशीलवार समोर दिला आहे

मंगळवार १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे येथील विद्याथी, विद्यार्थीनी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मानोरा येथे जाण्यासाठी कारंजा-मानोरा बसमध्ये प्रवास करीत असताना त्याच बसमध्ये आरोपी शेख शोएब शेख मलंग (२५) हा विद्यार्थिनींजवळ उभा राहिला. त्याने त्यांच्यासमोरच उभे राहून आपल्या मोबाईलमधील अश्लील चित्रफित आणि अश्लील छायाचित्रे पाहणे सुरू केले, तसेच अधूनमधून विद्यार्थीनींना धक्के देण्याचे प्रकारही केले.

जाणीव पूर्वक आदेश

बसमधील राहुल गटुले नावाच्या विद्यार्थ्याने या संदर्भात त्याला हटकून मुलांमध्ये बसण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे एका विद्यार्थीनीने मानोरा पोलिसांना दिलेल्या जबानी फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शेख शोएब शेख मलंग याच्याविरुद्ध कलम ३५४ अ (१) (२), ५0४, ५0६ भादंवि लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी अटक केली. या घटनेचा तपास बिट जमादार विजय जाधव व जमादार दिगांबर राठोड करीत आहेत

2 thoughts on “विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍याविरुद्ध गुन्हा ! Consequences of Unruly Behavior with Female Students

  1. खूप छान पेपर आहे. याच्यामध्ये मिळणारी माहिती खूप उपयोगाची आहे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात अशा गोष्टीसाठी आपल्याला सीएससी सेंटरवर जाऊन पैसे मोजावे लागतात या माहितीमुळे आता त्या पैशाची बचत होऊ शकते कारण आत्ता आपण ते घरूनच करू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *