Headlines

अवकाळी पाऊसाने नुकसान झाले मग पीक विमा क्लेम कसा करणार ? जाणून घ्या. ३ दिवसाच्या आत करावा लागेल . How to apply for Pik Vima?

claim on crop loan

मागील २ दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पाऊसाने बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जर शेतकऱ्यांचा पीक विमा काढला असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे आपण इथे समजून घेऊ शकता कि आपण पीक विमा साठी कसे पात्र आहेत आणि ते घेण्यासाठी काय केले पाहिजे .

पीक विमा अर्ज करण्यासाठी

तीन दिवसाच्या आताच आपल्याला पीक विमा साठी अर्ज करावा लागणार आहे अन्यथा तो ग्राह्य धरल्या जाणार नाही

पीक विमा हे दोन पद्धतीने केल्या जाऊ शकते इंटरनेट म्हणजे Online आणि ऑफलाईन

१. Online प्रक्रिया

१.१ आपण जर स्मार्ट मोबाइल वापरात असाल तर आपल्याला प्ले स्टोरे (Play Store ) मध्ये जाऊन (Crop Insurance) क्रॉप इन्शुरन्स हा अँप डाउनलोड करावा लागेल.

१.२ नंतर ते इन्स्टॉल करा त्या अँप ला ओपन करा CROP LOSS यावर क्लिक करा

१.३ तुमचा मोबाइलला नंबर द्या OTP द्या

१.४ रब्बी पीक यावर निवड व वर्ष २०२३ द्या

१.५ Fasal Vima Yojna निवडा

१.६ Maharashtra राज्य निवड Next वर क्लिक करा

१.७ आता तुमच्यासमोर फॉर्म येईन From where did you enroll? ह्या पर्यायांमध्ये Bank, CSC सीएससी, farmer ऑनलाईन intermediary हे पर्याय दिसतील यापैकी योग्य तो पर्याय निवडा मी या ठिकाणी पिक विमा हा सीएससी मधून अप्लाय केला असल्यामुळे या ठिकाणी सीएससी निवडून घेतो जर तुमचा पिक विमा बँक बँकेने भरला असल्यास बँक हा पर्याय निवडून घ्या

१.८ पोलिसी नंबर , पिकाची माहिती , तुमचे ठिकाण (लोकेशन ) Permission द्यावे लागेल मोबाइल मधून, तसेच नुकसान कशाने झाले (type of Incident ) तिथे Unseasonal rain (अवकाळी पाऊस ) , दिनांक , पिकाची स्थिती काढलेले किंवा उभे इत्यादी माहिती भरावी लागेल.

१.९ नंतर तुम्हाला upload photos / Videos (फोटो /विडिओ फाईल जोडा ) करायचे आहे .

अस्या प्रकारे online Crop Insurance Claim तुम्हाला करता येईन.

अधिक माहिती साठी :

प्रशांत आगे (७२७६७३६१७७)

२. पीक विमा ऑफलाईन प्रकारे कसा करणार

२.१ पीक विमा कंपनीला कॉल करावा लागेल

२.२ त्यांना तुम्हाला तपशील द्यावा लागेल

२.३ नंतर तुम्हाला क्लेम आईड दिला जाईन नंतर तुमचे क्लेम पूर्ण होईन .

अस्या प्रकारे तुम्ही आपल्या पिकाचे नुकसान झाले त्याचा क्लेम करू शकाल ..

One thought on “अवकाळी पाऊसाने नुकसान झाले मग पीक विमा क्लेम कसा करणार ? जाणून घ्या. ३ दिवसाच्या आत करावा लागेल . How to apply for Pik Vima?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *